ही TRICK वापरुन मिळवता येतो कुणाच्याही Facebookचा पासवर्ड

फेसबुक युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकजण हा आपल्या फेसबुकचा पासवर्ड दुसऱ्यासोबत शेअर करत नाही. मात्र, अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या आधारे तुमचा पासवर्ड हॅक होऊ शकतो.

Updated: Jan 22, 2018, 04:36 PM IST
ही TRICK वापरुन मिळवता येतो कुणाच्याही Facebookचा पासवर्ड title=

नवी दिल्ली : फेसबुक युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकजण हा आपल्या फेसबुकचा पासवर्ड दुसऱ्यासोबत शेअर करत नाही. मात्र, अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या आधारे तुमचा पासवर्ड हॅक होऊ शकतो.

या ट्रिकचा वापर करुन कुणीही तुमच्या फेसबुकचं पासवर्ड माहिती करु शकतं. अनेकदा बहुतेकजण कुठल्याही लिंकवर क्लिक करतं आणि त्यामध्ये लॉगिनही करतात. त्यामुळे कुठल्याही लिंकवर क्लिक करुन लॉगिन करु नका.

हॅक होऊ शकतो तुमचा पासवर्ड

अज्ञात लिंकवर क्लिक करुन लॉगिन करु नका. अशा लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फेसबुक पासवर्ड हॅक होऊ शकतो. हॅकर तुमचा पासवर्ड हॅक करुन तुमच्या फेसबुकवर काहीही पोस्ट करु शकतं. तुमच्या आयडीचा वापर क्रिमिनल अॅक्टिविटीजसाठी केला जाऊ शकतो.

असा मिळवता येतो पासवर्ड

सर्वात आधी हॅकर्स गुगल क्रोम किंवा इतर ब्राऊजरमध्ये z Shadow टाईप करेल. त्यानंतर पहिल्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. मग, एक पेज ओपन होईल. यामध्ये Sign up करावं लागेल. साईन अप केल्यानंतर काही माहिती तुम्हाला फिल करुन अकाऊंट बनवावं लागणार आहे. मग, कॅप्चा फिल करुन वेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण केल्यास अकाऊंट लॉगिन होईल.

पासवर्ड होईल चोरी

लागिन झाल्यावर राईट कॉर्नरमध्ये दिलेल्या भाषांपैकी इंग्लिशवर क्लिक करा. यावर क्लिक करताच एक लिंक ओपन होईल. ही लिंक कॉप करा. आता फेसबुक अकाऊंट ओपन करुन ज्याचा पासवर्ड माहिती करायचा आहे त्याला ही लिंक सेंड करा. ही लिंक नॉर्मल फेसबुक पेजप्रमाणे ओपन होईल.

तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमचा पासवर्ड चोरी होईल. हॅकर त्या पेजवर पुन्हा जाऊन MY Victim मध्ये क्लिक करेल आणि तुमचा पासवर्ड त्याच्या समोर असेल.