'ट्रोल'पासून वाचण्यासाठी ट्विटरचं नवं फिचर लॉन्च...

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर'नं आपल्या युझर्ससाठी एक नवीन फिचर लॉन्च केलंय...

Updated: Jul 11, 2017, 04:59 PM IST
'ट्रोल'पासून वाचण्यासाठी ट्विटरचं नवं फिचर लॉन्च...  title=

मुंबई : मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर'नं आपल्या युझर्ससाठी एक नवीन फिचर लॉन्च केलंय. 'ट्रोल'पासून हैराण होणाऱ्या युझर्ससाठी हा फिचर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 

'ट्विटर'नं आपल्या युझर्सच्या सुविधेसाठी Mute Notification चा ऑप्शन समोर आणलाय. या नव्या फिचरमुळे तुम्ही ज्या अकाऊंटसना फॉलो करत नाही त्या अकाऊंटवरून येणाऱ्या नोटीफिकेशन्स तुम्ही बंद करू शकता. 

या नव्या फिचरसाठी तुम्हाला Advanced Filter Settings मध्ये जाऊन Mute चा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. याशिवाय, ज्यांच्याकडे कन्फर्म ईमेल आयडी किंवा फोन नंबर नाही किंवा तुम्ही ज्यांना फॉलो करत नाही, अशा अकाऊंटसच्या नोटिफिकेशन्सला बंद करण्याची सुविधा या फिचरमुळे तुम्हाला मिळणार आहे. iOS युझर्सही या फिचरचा वापर करू शकतात. 

ट्विटरनं नुकतंच Automatic Night Mode फिचर लॉन्च केलं होतं... त्यानंतर आता Mute Notification ऑप्शनमुळे 'ट्रोल'पासून युझर्स लांब राहू शकतात.