Upcoming Car: दहा लाखाच्या बजेटमध्ये बेस्ट कार खरेदी करायची असेल तर जून पर्यंत वाट पाहा. जून महिन्यात काही नविन कार मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. जूनमध्ये सर्वप्रथम मारुतीची कार लाँच होऊ शकते. स्विफ्ट डिझायर सेडान कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच होणार आहे. मारुती सह Tata Altroz आणि Renault Duster चे अपडेटेड व्हर्जन देखील जून महिन्यात लाँच होणार आहेत.
जून महिन्यात मारुती न्यू डिझायर कार लाँच होणार आहे. ही नवी मारुती 7 ते 10 लाख रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते. मारुती न्यू डिझायर सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही सेडान कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या चार प्रकारांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. मारुती नवीन डिझायरमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मीटर सिस्टम, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असणार आहे. याचे इंजिन जुन्या Dezire प्रमाणे 1.2 लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल.
रेनॉल्ड्स दीर्घ काळानंतर आपले एक वाहन लॉन्च करणार आहे. कंपनी आपल्या सर्वात लोकप्रिय डस्टर एसयूव्हीचे अपडेटेड प्रकार सादर करणार आहे. Renault Duster चे अपडेटेड व्हेरियंट 10 ते 15 लाख रुपयांच्या रेंजमध्ये ऑफर केले जाईल. या एसयूव्हीमध्ये Y आकाराचे एलईडी डीआरएल आणि टेललाइट देण्यात येणार आहेत. तसेच, तुम्हाला एसयूव्हीच्या मागील आणि पुढच्या बंपरमध्ये बरेच बदल दिसतील. रेनॉल्ट डस्टरच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला सेंट्रल कन्सोल आणि सीट अपहोल्स्ट्री सारखी वैशिष्ट्ये मिळतील. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर रेनॉल्ट डस्टरच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही.
टाटा मोटर्स Altroz हॅचबॅक कारचे अपग्रेडेड व्हर्जन असलेली अल्ट्रोझ रेसर कार लाँच होणार आहे. अपडेचेड व्हर्जनमध्ये या कारमध्ये ड्युअल टोन कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे. यामुळे कंपनी अल्ट्रोज कारला रेसिंग कारप्रमाणे लाँच करणार आहे. तर नवीन Tata Altroz Racer ची किंमत सुमारे 10.90 लाखांच्या असणार आहे. यासह Altroz कार मध्ये इतरही अनेक अपडेटे फिचर्स मिळणार आहेत.