'या' कारणांमुळे तुमच्य़ा स्मार्टफोनचे Internet स्लो चालतंय, जाणून घ्या

आताचं सेंटीग्ज जाणून घ्या आणि  Internet चा स्पीड फास्ट करा

Updated: Jun 29, 2022, 09:00 PM IST
 'या' कारणांमुळे तुमच्य़ा स्मार्टफोनचे Internet स्लो चालतंय, जाणून घ्या title=

मुंबई : अनेक स्मार्टफोन युझर्स मोबाईलमध्ये स्लो इंटरनेट सुरु असल्याची तक्रारी करत असतात. काही ठिकाणी खरंच नेटवर्क कमी असतं तर काही ठिकाणी नेटवर्क असतं मात्र फोनमधील तांत्रिक बाबींमुळे इंटरनेट चालत नाही. या तांत्रिक बाबींवर काम केल्यास स्लो इंटरनेटची समस्या सुटू शकते. नेमकी प्रक्रिया कशी असते ते जाणून घेऊयात. 

स्लो इंटरनेटची अनेक कारणं आहेत. खराब नेटवर्क किंवा कमकुवत सिग्नल किंवा फोनची चुकीची सेटिंग. पण काही गोष्टींची काळजी घेऊन आपण आपल्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड वाढवू शकतो. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घेऊया.

न वापरते अ‍ॅप काढा 
जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये खूप अ‍ॅप्स अ‍ॅक्टिव्ह ठेवले असतील तर त्याचा परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर होतो. अधिक अ‍ॅप्स म्हणजे अधिक इंटरनेट वापर आणि यामुळे तुमचा वेग कमी होईल. कदाचित तुमच्या इंटरनेटचा वेग कमी होण्याचे हे एक कारण आहे. त्यामुळे आवश्यक नसलेले अॅप काढून टाका.  

वीक कनेक्शन कधीकधी स्लो इंटरनेटचे कारण बनू शकते. समजा तुम्ही अशा भागात आहात जिथे दूरसंचार टॉवर कमी आणि लोक जास्त आहेत. अशा ठिकाणी तुम्हाला स्लो इंटरनेट स्पीड नक्कीच मिळेल.

कॅचे फाइल्स
तुम्ही तुमच्या कॅचे फाइल्स क्लिअर करत राहिल्या पाहिजेत. फाइल्स क्लिअर न केल्यास फोनचे स्टोरेज भरते. इंटरनेटचा वेगही कमी होतो. तुम्ही जितक्या वेळा वेबसाइट उघडता तितक्या वेळा फोनमध्ये काही डेटा साठवते. तुम्ही वेळोवेळी कॅचे साफ करत राहा, त्य़ानंतर इंटरनेटचा स्पीड़ वाढेल.  

नेटवर्क सेटिंग रीसेट करा 
कधीकधी फोनचे नेटवर्क सेटिंग देखील स्लो इंटरनेटसाठी जबाबदार असते. अशास्थितीत तुम्ही फोनचे नेटवर्क सेटिंग रिसेट करून इंटरनेटचा वेग वाढवू शकता. याशिवाय,ऑन-ऑफ फ्लाइट मोडद्वारे देखील वेग वाढवू शकता. तुम्ही हे मॅन्युअली देखील करू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन नेटवर्क सेटिंग ऑटोमॅटिकवरून मॅन्युअलमध्ये काढून टाकावी लागेल.