नवी दिल्ली : भारत आणि जगभरातल्या १०० पेक्षा जास्त विंटेज आणि क्लासिक मोटर कार दिल्लीच्या ८व्या वार्षिक विंटेज कार रॅली आणि कान्कोर्समध्ये सहभाग घेणार आहेत.
भारताबरोबरच अमेरिका, सिंगापूर, इटली, यूके, फ्रांस, सेशेल्स या देशातल्या विंटेज कारही रॅलीमध्ये दिसणार आहेत. देशातल्या या मोठ्या विंटेज कार रॅलीमध्ये जगभरातल्या शानदार विंटेज कार सहभागी होणार आहेत.
विंटेज कार रॅलीचा या शोनं भारताला ग्लोबल विंटेज रॅलीच्या नकाशावर आणून ठेवलं आहे. या विंटेज कार रॅलीमुळे कार शौकिनांना जुन्या जमान्यातल्या कार पाहण्याची संधी मिळणार आहे.
या रॅलीमध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय लोकनृत्यही पाहायला मिळणार आहे. या कार रॅलीमध्ये यूकेमधून आलेली आय १९११ सिल्व्हर घोस्ट पाहण्याची संधी मिळणार आहे. ही कार सगळ्यात महाग विंटेज कार आहे.
या रॅलीला पहिल्यापेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. एवढच नाही तर यंदाच्या शोमध्ये १०० पेक्षा जास्त विंटेज कार असतील. २१ गन सेल्यूट इंटरनॅशनल प्रत्येक वर्षी विंटेज कार रॅलीचं आयोजन करतं. या रॅलीमध्ये कारबरोबरच मोटरसायकलही पाहायला मिळते.