Vivo च्या नव्या फोनमध्ये 24 MP फ्रँट कॅमेरा आणि जबरदस्त फिचर्स

मोबाईल निर्माता कंपनी वीवो ने आपला नवा प्रीमियम स्मार्टफोन वीवो वी ९ (Vivo V9) लॉन्च केला आहे.

Updated: Mar 22, 2018, 08:45 PM IST
Vivo च्या नव्या फोनमध्ये 24 MP फ्रँट कॅमेरा आणि जबरदस्त फिचर्स title=

नवी दिल्ली : मोबाईल निर्माता कंपनी वीवो ने आपला नवा प्रीमियम स्मार्टफोन वीवो वी ९ (Vivo V9) लॉन्च केला आहे.

कंपनीने हा फोन थायलँडमधील मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. त्यानंतर आता २३ मार्च म्हणजेच शुक्रवारी हा फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पाहूयात काय आहेत फिचर्स आणि किंमत...

भारतीय बाजारपेठेत लॉन्चिंगपूर्वी या फोनचा फ्रंट पॅनल आयफोन एक्स (iPhone x) सारखाच असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेऱ्यासोबत २४ मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा असणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन फोटोग्राफी एक्सपीरियंससाठी युजर्सला फायदेशीर ठरणार आहे.

ओरियो अँड्राईड

वीवो चा नवा फोन ८.१ ओरियो अँड्राईडवर चालतो. कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वीवो वी९ च्या अधिकृत टीजरवरुन दिसत आहे की सेल्फी कॅमेऱ्याला सेंसर देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये ड्युअल रियर कॅमेराही देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लॉन्च होणार आहे.

स्पेसिफिकेशन 

वीवो वी९ फोनमध्ये १०८०X२२८० पिक्सल रिझॉल्युशन असलेलं ६.३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२६ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅमसोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. तसेच इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून २५६ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.

कॅमेरा

फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच रियर साईडला दोन कॅमेरा देण्यात आले आहेत. प्रायमरी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आणि दुसरा ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

बॅटरी

या फोनमध्ये २६० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी यामध्ये ४जी एलटीई, वीओएलटीई, वाय-फाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजुला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. 
आयएएनएस न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, या फोनची भारतीय बाजारपेठेतील किंमत २५ हजार रुपये असण्याची शक्यता आहे.