मोबाईल सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी

कुठलंही नवं सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी काही खास गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

Sunil Desale Updated: Mar 22, 2018, 08:17 PM IST
मोबाईल सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी title=
Representative Image

मुंबई : सध्याच्या काळात ड्युअल सिम कार्डचे फोन्स बाजारात उपलब्ध आहेत. या सोबतच टेलिकॉम ऑपरेटर्सकडून मिळणाऱ्या ऑफर्समुळे युजर्स २ ते ३ सिमकार्ड वापरत असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. एकापेक्षा अधिक सिमकार्ड असणं आता सामान्य गोष्ट झालेली आहे. मात्र, कुठलंही नवं सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी काही खास गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

सिम डॉक्युमेंट्सवर पर्पज लिहून सही करा

सिम कार्ड खरेदी करताना आयडी आणि अॅड्रेस प्रूफच्या झेरॉक्स दुकानदाराला देताना त्यावर (केवळ सिम खरेदी करण्यासाठी) असं लिहून त्याखाली सही करा. यामुळे कुणीही याचा दुरुपयोग करु शकणार नाही.

सिम कार्डचं उघडलेलं पाकीट खरेदी करु नका

सिमकार्डचं पाकीट आधीच उघडलेलं असेल तर असं सिमकार्ड खरेदी करु नका. कारण, ते सिमकार्ड यापूर्वीच अॅक्टिव्हेट केललं असू शकतं. 

व्हेरिफिकेशन न करता सिमकार्ड खरेदी करु नका

जर दुकानदार किंवा एजंट तुम्हाला सांगत असेल की सिमकार्ड तात्काळ अॅक्टिव्हेट होईल त्याला कस्टमर केअरला कॉल करण्याची गरज नाही. तर अशावेळी थांबा कारण, ते सिमकार्ड यापूर्वी कुणाच्या तरी नावावर अॅक्टिव्हेट झालेलं असण्याची दाट शक्यता आहे.

फोटोवर क्रॉस सही करा

सिमकार्ड खरेदी करण्यासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांसोबत आपल्या फोटोवर परमनंट मार्करने सही करा. त्यामुळे या कागदपत्रांचा कुणालाही गैरवापर करता येणार नाही.

ओरिजनल कागदपत्र सोबत घ्या

सिम कार्ड खरेदी करण्यासाठी ओरिजनल कागदपत्रांची झेरॉक्स काढल्यावर कागदपत्र आपल्याकडे पुन्हा घ्या. दुकानात ओरिजनल कागदपत्रं सोडू नका. तसेच झेरॉक्स कॉपी चांगली न आल्यास ती सुद्धा तेथेच सोडू नका कारण, कुणीही त्याचा गैरवापर करु शकतं.

सिम अॅक्टिव्हेट न झाल्यास...

सिमकार्ड खरेदी केल्यावर आवश्यक कागदपत्र आणि थंब इंप्रेशन दिल्यावरही सिम अॅक्टिव्हेट न झाल्यास कुठल्याही दुकानदाराकडे जावू नका. तर, ज्या दुकानातून खरेदी केलं आहे त्याच्याकडे पुन्हा जा.

अधिकृत सेंटरमधूनच खरेदी करा सिम

नवं सिम कार्ड खरेदी करताना ते नेहमी अधिकृत सेंटरमधून किंवा सिमकार्ड विक्रेत्याकडूनच खरेदी करा. कुठल्याही दुकानातून सिम कार्ड खरेदी करु नका. कारण, असे दुकानादार तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर करणयाची शक्यता असते.