5000mAh बॅटरीचा सर्वांत स्वस्त Smartphone लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

खरचं इतक्या स्वस्त मिळतोय हा स्मार्टफोन, किंमत माहितीय का?

Updated: Aug 22, 2022, 09:30 PM IST
5000mAh बॅटरीचा सर्वांत स्वस्त Smartphone लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स  title=

मुंबई : देशभरात दररोज अनेक स्मार्टफोन लॉंच होत असतात. असाच एक स्मार्टफोन आता लॉंचं झाला आहे. या फोनची बॅटरी 5 हजार mAh असून इतक अनेक फिचर्स  देण्यात आले आहे. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत सर्वांधिक चांगले फिचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. किंमतीच्या बाबतीतही हा स्मार्टफोन ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या स्मार्टफोनचा नक्की विचार करा.  

विवो कंपनीने आपला बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला Vivo Y02s असे नाव दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने भन्नाट फिचर्स दिले आहेत. Vivo Y02s ची बॉडी उजव्या कोनातील फ्रेम डिझाइनसह येते. त्याच्या मागील बाजूस काचेसारखे साहित्य वापरले गेले आहे. याबद्दल, कंपनीचा दावा आहे की हे स्क्रॅच आणि फिंगरप्रिंट प्रतिरोधक आहे. 

या स्मार्टफोनच्या फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या मागील बाजूस सिंगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. 8 मेगापिक्सल सेन्सरसह येते. मात्र, कॅमेरा मॉड्यूलवर दोन बंप देण्यात आले आहेत. हे एलईडी फ्लॅशसह येते. फोनच्या पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 

स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक आहे. हा स्मार्टफोन Android 12 आधारित Funtouch OS वर काम करतो. हा फोन सॅफायर ब्लू आणि शाइन ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.

फिचर्स 

  • स्मार्टफोनमध्ये  5,000mAh बॅटरी 
  • 6.51-इंच वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन 
  • स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर
  • 3GB आणि 32GB ऑनबोर्ड मेमरी, मायक्रो-एसडी कार्डने वाढवता येणार 
  • 8 आणि 5  मेगापिक्सल कॅमेरा

किंमत किती?
विवोचा Vivo Y02s सध्या चीनमध्ये लॉन्च झाला आहे. चीनमध्ये त्याची किंमत 906 युआन (10,622 रुपये) ठेवण्यात आली आहे. ही किंमत फक्त 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. याच्या भारतातील लॉंचबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

दरम्यान कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी हा स्मार्टफोम चांगला पर्याय असणार आहे. त्यामुळे देशात लॉंच झाल्यानंतर हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येणार आहे.