Vivo Y83 स्मार्टफोन भारतात लॉन्च

चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो ने Vivo Y83 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Vivo Y83 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

Updated: Jun 2, 2018, 12:19 PM IST
Vivo Y83 स्मार्टफोन भारतात लॉन्च title=
Image: www.vivo.com

मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो ने Vivo Y83 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Vivo Y83 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनची खाब बाब म्हणजे 19:9 अॅस्पेक्ट रेश्यो असलेला मोठा डिस्प्ले. तसेच फोनच्या स्क्रिनवर iPhone X सारखे डिस्प्ले नॉचही आहेत. कंपनीने हा फोन भारतीय बाजारपेठेत 32 GB स्टोरेजसह लॉन्च केला आहे.

Vivo Y83 स्मार्टफोनची किंमत...

कंपनीने Vivo Y83 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 14,990 रुपयांत लॉन्च केला आहे. भारतात कंपनीने 4GB रॅम आणि 32 GB स्टोरेजसह लॉन्च केला आहे. हा फोन देशभरातील ऑफलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध असणार आहे. यासोबतच ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या प्लॅटफॉर्मवर फोन एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय सुविधेसह मिळणार आहे. तसेच कंपनी आपल्या अधिकृत वेबसाईटवरुनही या फोनची विक्री करणार आहे.

Vivo Y83 फोनचे स्पेसिफिकेशन

ड्युअल सिम असलेला Vivo Y83 हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरियोवर आधारित फनटच ओएस 4.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा एचडी+ (720+1520 पिक्सल) फुलव्यू 2.0 आयपीएस डिस्प्लेसह उपलब्ध आहे. अॅस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. Vivo Y83 फोनमध्ये ऑक्टा-कोअर हिलियो पी20 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 4GB रॅम देण्यात आला आहे.

Vivo Y83 चा कॅमेरा 

Vivo Y83 या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा सेंसर आहे जो एलईडी फ्लॅश सपोर्टसह आहे. फ्रँट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. कॅमेरा फिचरमध्ये एआय फेस ब्यूटी, पोर्ट्रेट मोड, लाईव्ह फोटो आणि ग्रुप सेल्फीचा समावेश आहे. फोनची इनबिल्ट स्टोरेज 32 GB असून आवश्यकता असल्यास मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच फोनमध्ये 3260 mAh बॅटरी देण्यात आली आहे.