नवी दिल्ली : रिलायन्स जिओमुळे इतरही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या कॉल दरात घट करत नव-नवे प्लान्स सादर करण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या ग्राहकांना एकत्र ठेवण्यासाठी आणि नवे ग्राहक जोडण्यासाठी वोडाफोनने दोन नवे प्लान्स लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
वोडाफोनने जिओच्या डेटा प्लान्सला टक्कर देण्यासाठी दोन नवे धमाकेदार प्लान्स लॉन्चिंगची तयारी सुरु केलीय. या प्लान्समध्ये ग्राहकांना दररोज 4.5 GB इंटरनेट डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
वोडाफोनने 799 रुपये आणि 549 रुपयांचे प्रीपेड प्लान्स लॉन्च केले आहेत. हे प्लान्स रिलायन्स जिओच्या प्लान्सला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे.
टेलिकॉमटॉकच्या रिपोर्टनुसार, वोडाफोनने 799 रुपये आणि 549 रुपये असे दोन प्लान्स लॉन्च केले आहेत. युजर्सला 799 रुपयांच्या प्लान्समध्ये दररोज 4.5 GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. तर, 549 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 3.5GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लान्समध्ये वोडाफोनने काही ठराविक सर्कलमध्ये लॉन्च केलं आहे.
इंटरनेट डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा वोडाफोनच्या दोन्ही प्लान्समध्ये मिळणार आहे. यासोबतच एसएमएस सुविधाही मिळणार आहे. या प्लान्सची वैधता 28 दिवसांची असणार आहे.
वोडाफोनचे दोन नवे प्लान्स रिलायन्स जिओला टक्कर देणार आहेत. जिओच्या 799 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 5 GB इंटरनेट डेटा मिळतो तर वोडाफोनच्या 799 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 4.5 GB डेटा मिळतो. जिओच्या 509 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी 4GB डेटा मिळतो तर वोडाफोनच्या 549 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 3.5 GB डेटासोबत कॉलिंगची सुविधा मिळते.