5G Smartphone च्या विश्वात धुमाकूळ घालायला येतोय Vivo चा रंग बदलणारा Smartphone

अवघ्या तासाभरातमध्ये रंग बदलनारा धमाकेदार स्मार्टफोन Vivo कंपनीकडून आज लाँच केला जाणार आहे. या तडफदार स्मार्टफोनचा लाँच इव्हेंट तुम्ही या ठिकाणी लाईव्ह देखील पाहू शकता...

Updated: Aug 17, 2022, 11:18 AM IST
5G Smartphone च्या विश्वात धुमाकूळ घालायला येतोय Vivo चा रंग बदलणारा  Smartphone title=

मुंबई : अवघ्या तासाभरातमध्ये रंग बदलनारा धमाकेदार स्मार्टफोन Vivo कंपनीकडून आज लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि डिझाईन सर्वांनाच खुप आकर्षित करत आहे. Vivo V25 Pro या तडफदार स्मार्टफोनचा लाँच इव्हेंट तुम्ही या ठिकाणी लाईव्ह देखील पाहू शकता...

भारतीय बाजारपेठेत लेटेस्ट व्ही- सीरीज हाय मिड-रेंज स्मार्टफोन लाँच करण्यासाठी Vivo कंपनी पुर्णपणे तयार आहे. आज भारतात Vivo V25 Pro या स्मार्मफोनची घोषणा होणार आहे. 25 ऑगस्टपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. भारतीय बाजारपेठेत Vivo V25 Pro या स्मार्टफोनची लाँच इव्हेंट आज दुपारी 12 वाजता होणार आहे. या इव्हेंटमध्ये प्रो मॉडेलसोबतच कंपनी स्टँडर्ड Vivo V25 देखील लाँच केला जाणार आहे. 

Vivo V25 Series Launch Event Live Streaming

Vivo कंपनी त्यांच्या ऑफिशिअल यूट्यूब अकांउंटवर या इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग केली जाणार आहे. भारतात लाँच होणाऱ्या Vivo V25 Series च्या लाँच इव्हेंटला या ठिकाणी क्लिक करुन खाली एमंबेड केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता.  

Vivo V25 Pro Specifications

Vivo V25 Pro हा स्मार्टफोन नव्या कर्व्ड स्क्रीन डिझाईनसोबत मिळणार आहे. यामध्ये मधल्या ठिकाणी पंच होल कटआऊट सोबतच एक 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले उपलब्ध असणार आहे. जो एक फुल HD + स्क्रीन रिजॉल्यूशन आणि एक 120Hz हाई रिफ्रेश रेटने सुसज्ज्य आहे. हा स्मार्टफोन डिवाइस मीडियाटेक डाइमेंशन 1300 SoC द्वारे कार्यरत असेल, जो कि OnePlus Nord 2T आणि  OPPO Reno 8 सारख्या इतर स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि  256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.

Vivo V25 Pro Camera

या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये OIS सोबतच 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाई़ड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर असेल. पुढच्या बाजूस, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा स्प्नॅपर असण्याची शकत्यता आहे. 

Vivo V25 Pro Battery

Vivo V25 Series या स्मार्टफोनमध्ये त्यांच्या फनटच ओएस 12.1 कस्टम यूजर इंटरफेससोबतच अँड्रॉईड 12 ओपरेटिंग सिस्टिम आऊट ऑफ द बॉक्स असेल. प्रो मॉडेलमध्ये 66W फास्ट चार्जिंगच्या सपोर्ट सोबतच 4,830mAh ची बॅटरी आहे.