लग्नाआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात ?

Relationship Tips:  काही गोष्टींची अपेक्षा होती, पण यातला तिसऱ्या पर्यायाचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. 

Updated: Nov 11, 2022, 10:45 AM IST
लग्नाआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात ? title=
What do boys search on google before getting married

Relationship Tips:  (Wedding) लग्न, हा जीवनातील एक असा टप्पा आहे, जो प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यालाच कलाटणी देतो. रिलेशनशिपमध्ये असणं आणि ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न करणं ही बाब अनेकांना सुखावह वाटते. पण, प्रत्यक्षातील अनुभव ऐकून मात्र अनेकांनाच लग्नाचा उल्लेख जरी केला तरी धडकी भरते. ज्याप्रमाणं लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलतात, अनेक तडजोडी कराव्या लागतात त्याचप्रमाणं पुरुष/ मुलांसोबतही लग्नानंतर असंच काहीसं घडतं. किंबहुना लग्न होण्याआधी मुलांच्याही मनात काही गोष्टींबाबत प्रश्नांचा काहूर माजलेला असतो.

वाचा : Google Chrome युजर्स आताच्या आता Delete करा हे App; नाहीतर मिळेल जबरदस्त दणका 

काही प्रश्न असे असतात ज्याबद्दल मुलं खास मित्रासोबतही बोलण्यास संकोचतात. अशा वेळी त्यांना Google चा आधार मिळतो. सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं आणि शंका निरसन करणारं गुगल या लग्नासाठी सज्ज असणाऱ्या मुलांचीही मदत करतो. चला तर मग, बोहल्यावर चढण्याआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च (Search) करतात? 

Savings, Investment कशी वाढवता येईल 

नोकरी आणि आर्थिक गोष्टीमध्ये असणारं अस्थैर्य पाहता आपली आर्थिक बाजू लग्नानंतरही कशी भक्कम करता येईल, हा प्रश्न मुलांना सतावत असतो. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ते गुगलचा बऱ्याचदा आधार घेतात. Savings आणि Investment अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल हा त्यांना पडणारा प्रश्न असतो. 

मी लग्नासाठी घाई तर करत नाहीये ना? (Right Age to get married)

लग्नासाठी मुलं आणि मुली कितीही उत्सुक किंवा आनंदी असले तरीही आरण लग्नासाठी घाई तर करत नाही आहोत ना? हाच प्रश्न त्यांच्या मनात घर करत असतो. ज्यामुळं लग्न करण्याचं योग्य वय काय?, मी लग्नासाठी घाई तर करत नाहीये ना? असे प्रश्न मुलं गुगलला विचारतात. 

पत्नीचं आपल्या घरातल्यांसोबत जुळेल ना? (Will my to be wife manage with new family)

होणारी पत्नी ही आपल्यासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असो (Love Marriage) किंवा मग, Arranged Marriage करत आपली जोडीदार होणार असो. पण, ती घरात आल्यानंतर तिचं आपल्या कुटुंबाशी जुळेल ना? घरातल्यांमुळे ती किंवा तिच्यामुळे घरातले दुखावले तर जाणार नाहीत ना? पत्नी आणि कुटुंबीयांना एकत्र आनंदी ठेवण्याचा सुवर्णमध्य काय? असे प्रश्न विचारत आणि लेख वाचत मुलं त्यांची उत्तरं मिळवतात. 

वाचा : Danger! 2 मिनिटात तयार होणारी Maggi खात असाल तर थांबा!

 

ती माझ्याकडून घटस्फोट (Divorce) तर मागणार नाही? 

गेल्या काही वर्षांमध्ये वैवाहिक नात्यामध्ये असणाऱ्या अडचणी पाहता आमचं नातं किती काळ टिकेल इथपासून होणारी पत्नी अर्थावरच साथ सोडणार नाही ना? (Separation) घटस्फोट मागणार नाही ना? (Divorce) असे मनावर दडपण आणणारे प्रश्नही मुलं गुगलवर सर्च करतात. 

Family Planning केव्हा करु ? 

लग्नानंतर बऱ्याच जोडप्यांच्या बाबतीत Family Planning कधी करताय हा प्रश्न कुटुंबय सातत्यानं विचारतात असं होतं. पण, मुळात आपण या नात्यात मुलाचा विचार केव्हा करावा हा प्रश्नही मुलं लग्नाआधीच Google ला विचारतात. 

(What do boys search on google before getting married?) मुलं गुगलवर काय सर्च करणार असतील, याविषयीचे बरेच पूर्वग्रह अनेकांनी बांधलेले असतात. पण, प्रत्यक्षात मात्र ही मंडळी काय सर्च करतात हे अखेर समोर आलं आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.