नवी दिल्ली : ट्विटर आणि फेसबुक या सोशलमीडिया कंपन्यांन्या सरकारने गाइडलाईन बनवण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ दिला होता. ज्याची मुदत आज संपत आहे. आता भारतीय कंपनी कू वगळात कोणत्याही कंपनीने सरकारला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे बुधवार पासून सोशल मीडिया बंद होईल का याबाबत चर्चा सुरू आहेत.
सरकारचे नियम अटी मान्य न केल्यास आणि मुदतही संपल्यास आता पुढे काय? तर सर्वात आधी हे समजने गरजेचे आहे की, सोशल मीडिया कंपन्यांसमोर पर्याय काय? सोशलमीडिया कंपन्या या अटींसाठी आणखी मुदत मागू शकते. त्याला कोरोनाचे कारणही देऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे नियम आणि अटींचे पालन करणार असल्याचे लिहून देऊ शकतात.
अशा परिस्थितीत सरकारसमोर काय पर्याय आहेत. कंपन्यांनी जर आग्रह केला की, आम्हाला मुदतवाढ मिळावी. तर सरकार त्याचा विचार करू शकते. किंवा सरकार IT अॅक्टच्या अंतर्गत सर्व नियम बंधनकारक करू शकते.
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या वापराबाबत अनेक टीका होत आहेत. अफवा, बदनामीकारक मजकूर, आक्षेपार्ह मजकूर, देशातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत.
यातील काही घटना न्यायालयातही गेल्या आहेत. सरकार पुन्हा पुन्हा देण्यात आलेल्या निर्देशांनंतरही सोशल मीडिया कंपन्यांनी काही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यानंतर या कंपन्यांना कठोर गाइडलाईन बनवण्याचे निर्देश देण्यात आले होते.