Auto Tips: बाइक, स्कूटर किंवा कारमध्ये साप घुसला तर 'या' तीन बाबी करा, अन्यथा...

वाहनात साप घुसल्याचं कळताच काळजी घेणं आवश्यक आहे. काही साप विषारी असतात आणि त्यांच्या दंशाने जीव जाण्याची शक्यता असते. 

Updated: Aug 7, 2022, 01:21 PM IST
Auto Tips: बाइक, स्कूटर किंवा कारमध्ये साप घुसला तर 'या' तीन बाबी करा, अन्यथा... title=

What If Snake Gets Into Bike, Scooter Or Car: घर किंवा इमारत जंगल किंवा झाडंझुडपांच्या जवळ असेल तर सापांची भिती असते. आपण अशा ठिकाणी गाडी पार्क करतो आणि निघून जातो. पण साप नकळत आपल्या वाहनात ठाण मांडून बसतो. त्यामुळे वाहनात साप घुसल्याचं कळताच काळजी घेणं आवश्यक आहे. काही साप विषारी असतात आणि त्यांच्या दंशाने जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे साप दिसला तर घाबरून न जाता पुढे दिलेल्या तीन गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. यामुळे सापापासून तुमचा बचाव होईल आणि गाडीही व्यवस्थितरित्या बाहेर काढता येईल. 

घाबरू नका: वाहनात जर तुम्हाला साप दिसला तर घाबरू नका. कारण साप दिसताच अनेकांची बोबडी वळते. तसेच काय करावं आणि काय नको? याबाबत चिंता लागते. यासाठी गाडीत साप दिसल्यास शांतपणे विचार करा आणि पुढची पावलं उचला.

वाहनापासून दूर उभे राहा: वाहनात साप दिसल्यानंतर किती विषारी आहे, याचा अंदाज नसतो. त्यामुळे वाहनांपासून दूर उभं राहा. कारण साप तुमच्या बचावासाठी हल्ला करू शकतो. तसेच इतरानाही वाहनापासून दूर उभं राहण्याच्या सूचना करा. 

वन विभाग किंवा सर्पमित्राला सूचना द्या: तुमच्या वाहनात साप असल्याचं कळालं की लगेच वनविभागाला माहिती द्या. वनविभागाची टीम तुमचं वाहन असलेल्या ठिकाणी येईल. इथून पुढे सर्व काम वनविभागाच्या टीमवर सोपवा. वनविभाग स्वतः परिस्थिती हाताळेल आणि तुमचे वाहन सापांपासून मुक्त करेल. त्यानंतर तुम्ही तुमचे वाहन आरामात वापरू शकता.