500 गावांना दत्तक घेऊन त्या गावांसाठी काय करणार Whatsapp

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गावं का दत्तक घेतंय Whatsapp, नेमका काय प्लॅन जाणून घ्या

Updated: Dec 16, 2021, 04:53 PM IST
500 गावांना दत्तक घेऊन त्या गावांसाठी काय करणार Whatsapp title=

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये Whatsapp ने आपल्या अॅपमध्ये ग्राहकांसाठी अनेक सोईयुविधा देत आहे. Whatsapp ने आता 500 गावं दत्तक घेतली आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील 500 गावं Whatsapp ने दत्तक घेतली आहेत. बुधवारी Whatsapp ने यासंदर्भात एक घोषणा केली. स्मार्टफोन वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट प्रणालीची वेगळी ओळख करून देण्यासाठी Whatsapp पुढाकार घेत आहे. 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार पायलट प्रोग्राम डिजिटल पेमेंट्स मोहिमेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील 500 गावांचा समावेश आहे. WhatsApp Pay च्या माध्यमातून डिजीटल पेमेंटकडे लोक वळावेत यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. 

स्थानिक पातळीवर डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये व्यावहारिक बदल घडवून आणणं. शिवाय जास्तीत जास्त लोकांनी Whatsapp pay कडे वळावं हा त्यामागचा उद्देश आहे. WhatsApp च्या माध्यमातून आर्थिक गती देण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 500 गावांचा प्रायोगिक तत्वावर समावेश केला आहे. 

पुढील 500 दशलक्ष डिजिटल पेमेंट इकोसिस्टमला जोडण्याचे आमचे ध्येय आहे. असं Whatsapp चे प्रमुख अभिजित बोस यांना माहिती दिली आहे. किराणा सामानापासून ते  ब्यूटी-पार्लरपर्यंत अनेक पेमेंट सुरळीत व्हावे यासाठी Whatsapp कडून सेवा नागरिकांना पुरवली जाणार आहे. ज्यांना यामध्ये अडचणी येत आहेत त्यांना Whatsapp pay शिकवण्याकडे कंपनीचा कल असणार असंही स्पष्ट केलं आहे.