व्हॉटसअपचं नवं फिचर, चुकीनं पाठवलेला मेसेज करा डिलीट!

व्हॉटसअपनं युझर्ससाठी एक खुशखबर दिलीय... खरं म्हणजे या बातमीची युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते...

Updated: Oct 27, 2017, 08:50 PM IST
व्हॉटसअपचं नवं फिचर, चुकीनं पाठवलेला मेसेज करा डिलीट! title=

मुंबई : व्हॉटसअपनं युझर्ससाठी एक खुशखबर दिलीय... खरं म्हणजे या बातमीची युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते...

कंपनीनं आपल्या युझर्ससाठी 'डिलीट फॉर एव्हरीवन' नावाचं एक नवं फिचर सादर केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉटसअपनं आयओएस आणि विंडोज फोन युझर्ससाठी रिकॉल फिचर जाहीर केलंय. या फिचरबद्दल आधीच बातम्या आल्या होत्या... परंतु, व्हॉटसअप याची टेस्टिंग करत होतं... त्यामुळे युझर्स याची आतुरतेनं वाट पाहत होते.

'डिलीट फॉर एव्हरीवन'

व्हॉटसअपचं रिकॉल फिचर 'डिलीट फॉर एव्हरीवन'मुळे तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवलेला एखादा मेसेज पुन्हा मागे घेऊ शकता. जर तुम्ही चुकीने एखादा मेसेज केला असेल तर तो तुम्ही डिलीट करू शकता. 

हे फिचर वापरण्यासाठी मेसेज पाठवणाऱ्या आणि मॅसेज रिसिव्ह करणाऱ्या दोन्ही युझर्सकडे व्हॉटसअपचं अपडेटेड व्हर्जन असायला हवं. याच्या मदतीनं तुम्ही टेक्स्ट मेसेजशिवाय इमेज, GIF फाईल, व्हॉईस मेसेज, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेलही मागे घेऊ शकाल.

वेळेची मर्यादा

पण, यासाठी वेळमर्यादेचं बंधन व्हॉटसअपनं घातलंय. मेसेज पाठवल्यानंतर सात मिनिटांमध्ये तुम्ही हा मेसेज मागे घेऊ शकाल... सात मिनिटांनंतर तुम्ही हा मेसेज रिकॉल करू शकणार नाहीत. 

...तर डिलीट करता येणार नाही

महत्ताचं म्हणजे, जर तुम्ही एखाद्याच्या मेसेजला रिप्लाय केला असेल तर तुम्ही तो मेसेज डिलीट करू शकणार नाही. शिवाय तुम्ही ब्रॉडकास्ट मेसेज केला असेल तर तोही तुम्हाला डिलीट करता येणार नाही.