Whatsapp वरून तुमचं बँक खातं कसं काढायचं किंवा बदलायचं? वापरा ही सोपी ट्रिक

Whatsapp पेमेंट वापरताना जर तुम्हाला तुमचं खातं बदलायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर त्याची आज तुम्हाला सोपी युक्ती सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही तुमचं खातं बदलू शकता. या फीचर बद्दलही थोडक्यात जाणून घेऊया.

Updated: Feb 17, 2022, 08:09 PM IST
Whatsapp वरून तुमचं बँक खातं कसं काढायचं किंवा बदलायचं? वापरा ही सोपी ट्रिक title=

मुंबई: सर्वात लोकप्रिय App म्हणजे Whatsapp अगदी मित्र-मैत्रिणींच्या गप्पांपासून ते कामापर्यंत सगळी कामं या एका अॅपवर सहज सोप्या पद्धतीनं होतात. अगदी एखादा महत्त्वाचा फोटो किंवा डॉक्युमेंटही सहज पाठवता येतं. आता तर payment ची सुविधा देखील आली आहे. तुम्ही थेट UPI आयडी लिंक करून पेमेंट करू शकता. 

Whatsapp पेमेंट वापरताना जर तुम्हाला तुमचं खातं बदलायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर त्याची आज तुम्हाला सोपी युक्ती सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही तुमचं खातं बदलू शकता. या फीचर बद्दलही थोडक्यात जाणून घेऊया.

'वॉट्सएप पे' नेमकं काय फीचर
व्हॉट्सएप पे हे  व्हॉट्सएपमधील एक खास फीचर आहे. जे गेल्या काही दिवसांपूर्वी लाँच झालं. याचा वापर करून तुम्ही अगदी सहज आपल्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना पेमेंट करू शकता.  तुम्ही चॅटमध्येच पैसे पाठवू शकता किंवा घेऊ देखील शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे हे फीचर डेव्हलप करण्यात आलं आहे. 

कसे सेव्ह करायचे बँक अकाऊंट डिटेल्स 
तुम्हाला रुपीचं चिन्हं उजव्या कोपऱ्यात दिसेल. तिथे क्लिक करा तिथे तुमचं UPI अकाऊंट किंवा बँक खातं लिंक करा. ज्या पद्धतीनं तुम्ही खातं Add केलं तशाचं पद्धतीनं तुम्ही ते खातं काढू देखील शकता. 

कसं बदलायचं प्रायमरी अकाऊंट 
तुम्हाला जर प्रायमरी अकाऊंट बदलायचं असेल तर काही सोप्या टिप्स वापरा. ‘मोर ऑप्शन्स’ निवडा त्यानंतर पेमेंट पर्याय निवडा. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला जे अकाऊंट प्रायमरी करायचं त्यावर क्लिक करा. ज्या पद्धतीनं Gpay किंवा फोन पेमध्ये आपण प्रायमरी अकाऊंट सेट करतो अगदी तिच पद्धत इथे वापरायची आहे. 

असं हटवा अकाऊंट
तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स WhatsApp Pay वरून काढायचे असल्यास, पहिल्यांदा WhatsApp वर जा आणि 'पेमेंट्स' वर क्लिक करा. त्यानंतर त्या बँक खात्यावर क्लिक करा आणि नंतर 'बँक खाते काढा' वर क्लिक करून खाते हटवा.