close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तुमचं WHATSAPP लगेच अपडेट करा, नाहीतर नुकसानाचा सामना करावा लागू शकतो

व्हॉटसअॅपवर 'स्पायवेअर' डिटेक्ट 

Updated: May 14, 2019, 05:16 PM IST
 तुमचं WHATSAPP लगेच अपडेट करा, नाहीतर नुकसानाचा सामना करावा लागू शकतो

मुंबई : व्हॉटसअॅपने आपल्या दीड कोटी युझर्सना सांगितलं आहे, तुमचा व्हॉटसअॅप लवकर अपग्रेड करा. कारण फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटसअॅप या इन्स्टंट मॅसेजिंग अॅपवर 'स्पायवेअर' डिटेक्ट झाला आहे. हा स्पायवेअर तुमच्या फोनमध्ये गुप्तहेरासारखं काम करतो, असं म्हटलं जातं. हा स्पायवेअर अॅपवरून कॉलिंग केल्यावर फोनमध्ये शिरतो. या कथित स्पायवेअरच्या बाबतीत सांगितलं जातं की, हा इस्त्राईलच्या एका सायबर ग्रुपने हा बनवला आहे. या ग्रुपचं नाव NSO Group असल्याचं सांगितलं जातं.

बचाव करण्यासाठी

'फायनॅनशियल टाईम्स'ने दिलेल्या बातमीनुसार, व्हॉटसअॅपने यातील त्रुटी आता दूर केल्या आहेत. जेणे करून हा स्पायवेअर तुमच्या फोनमध्ये येणार नाही. मागील महिन्यात स्पायवेअर आला होता, यानंतर अॅपमध्ये काही बदल करण्यात आला आहे. 

यामुळे कंपनीने सांगितलं आहे की, युझर्सने हा अॅप अपग्रेड करणे अत्यंत महत्वाचं आहे. तसेच नेहमी आपली ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा. यामुळे आपल्या फोनमध्ये कोणताही व्हायरस येणार नाही. तसेच आपली खासगी माहिती आणि फोटो देखील सुरक्षित राहतील.

युझर्स टार्गेट

Whats App ने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला फार कमी मोबाईल युझर्सच्या फोनवर झाला आहे. पण ज्या युझर्सच्या फोनमध्ये या व्हायरसने प्रवेश केला, त्यांच्यासाठी गंभीर आणि चिंतेची बाब आहे. कारण त्यांना हेच समजणार नाही, की आपल्या फोनमध्ये हा स्पायवेअर आला आहे.

फेसबूकचे २.३८ अब्ज युझर्स

या महिन्याच्या पहिल्या तिमाहीला सोशल मीडिया दिग्गजांची सक्रिय युझर्स संख्या दर वर्षीच्या आधारानुसार ८ टक्के वाढून २.३८ अब्ज झाली आहे. तर दुसरीकडे फेसबूक स्टोरीज वापरणाऱ्यांची संख्या ५० कोटी झाली आहे.