WhatsApp new privacy features : तुमचं व्हाट्सअॅप आता लवकरच आणखी स्मार्ट होणार. प्रायव्हसी संबंधीत 3 नवीन बदलांसह तुमचं व्हाट्सअॅप आणखी सिक्यूअर होणार. व्हाट्सअॅपने लवकरच काही फीचर्स लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला कोणी ऑनलाईन पहावं आणि कोणी नाही हे आता तुम्हाला ठरवता येणार आहे. त्याचबरोबर, तुम्ही जर व्हाट्सअॅपचा कोणताही ग्रुप लेफ्ट करायाचा असेल तर आता ते देखील सहजपणे शक्य होणार आहे.
इतकंच नाही तर, तुम्ही जेव्हा मेसेज पाठवताना व्ह्यू वन्स असा पर्याय निवडता तेव्हा त्या मेसेजला ओपन केल्यानंतर स्क्रीनशॉट काढण्याची मुभा होती, पण आता तुम्ही नवीन फीचर्सनुसार मेसेजचे स्क्रीनशॉट ब्लॉक करु शकता.
तुम्ही जेव्हा व्हाट्सअॅप वापरता तेव्हा अनेकांच्या नजरा या तुमच्या ऑनलाईन असण्याकडे असतात. आता मात्र तुम्ही ठरवू शकणार आहात की, तुम्हाला ऑनलाईन असताना कोणी पहावं आणि कोणी नाही. हे नवीन फीचर WhatsApp चालू महिन्याच्या शेवटी रोल आऊट करेल असा अंदाज आहे.
Your privacy deserves more protection.
That's why we're excited to announce three layers of security to wrap your messages in.
Learn what they do pic.twitter.com/AmV0YoZcC8
— WhatsApp (@WhatsApp) August 9, 2022
तुमचा मेसेज प्रायव्हेट राहावा म्हणून तुम्ही व्हीव वन्सचा पर्याय निवडता पण त्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढण्याची मुभा देखील व्हाट्सअॅप देतं. पण नवीन बदलानुसार याता तुम्ही व्ह्यू वन्सच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढण्याचा ऑप्शन ब्लॉक करु शकता. या फीचर्सची सध्या चाचणी सुरु आहे. लवकरच हे नवीन फीचर रोल आऊट केलं जाऊ शकतं.
कित्तेकदा असं होतं की, आपली इच्छा नसताना आपण एकाद्या व्हाट्सअॅपच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे त्या ग्रुपमधून लेफ्ट व्हायचं असतं पण अडचण ठरते ती नोटिफिकेशनची. कारण, तुम्ही लेफ्ट झाल्याचं नोटिफिकेशन हे सर्वांपर्यंत पोहोचतं. आता नवीन फीचरमुळे मात्र तुमची अडचण दूर होणार आहे. हे नवं फीचर त्या ग्रुपच्या अॅडमिनलाच नोटिफिकेशन मिळेल इतर कोणत्याही सदस्याला या संबंधीचं नोटिफिकेशन मिळणार नाही. हे फीचर या महिन्याच्या शेवटी रोल आऊट होऊ शकते.