तुम्हीही ऍपल वॉच वापरताय? मग फसवणूक होण्यापूर्वीच ही बातमी वाचा

ऍपल वॉच स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. मात्र ऍपल वॉचमुळे एक महिला चक्क कंगाल झालीय

Updated: May 25, 2022, 04:30 PM IST
तुम्हीही ऍपल वॉच वापरताय? मग फसवणूक होण्यापूर्वीच ही बातमी वाचा title=

मुंबईः ऍपल वॉचमुळे एका महिलेचं जवळपास 31 लाखांचं नुकसान झालंय. फिरायला गेलेल्या महिलेचे ऍपल वॉच हरवले आणि काही तासांतच तिची 40 हजार डॉलरची फसवणूक झाली. 

स्मार्टवॉचबद्दल बोलायचे झाले तर ऍपल वॉचचे नाव पहिले येईल. ऍपल वॉच त्याच्या स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. मात्र ऍपल वॉचमुळे एक महिला चक्क कंगाल झाली.

या महिलेची सुमारे 31 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. फिरायला गेलेल्या महिलेचे ऍपल वॉच हरवले आणि काही तासांतच तिची 40 हजार डॉलर खात्यातून गायब झाले.

फ्लोरिडा येथील डिस्ने वर्ल्ड येथे एका राइड दरम्यान तिची ऍपल घड्याळ हरवल्याचा दावा एका अमेरिकन महिलेने केला आहे, महिलेच्या दाव्यानुसार हे घड्याळ 1300 डॉलरचं होतं, या घड्याळासोबत महिलेचे अनेक क्रेडिट कार्ड लिंक होते.

यापैकी एक क्रेडिट कार्ड अमेरिकन एक्सप्रेसचे होते, ज्याची क्रेडिट लिमिट अनलिमिटेड होती. क्रेडिट कार्डच्या फसवणुकीची माहिती मिळताच महिलेने सर्व कार्ड निष्क्रिय केले.

मात्र Appleने म्हटलंय की, वॉच मनगटातून काढून टाकताच ते आपोआप लॉक होते आणि लॉक काढण्यासाठी पिन पुन्हा टाकावा लागतो तेव्हाच पेमेंट केले जाऊ शकते. रिपोर्टनुसार, अशा परिस्थितीत ऍपल वॉचमुळे क्रेडिट कार्ड फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे.