मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने Mi 8 Youth च्या 4 जीबी वेरिएंटला लाँच केलं आहे. कंपनीने Xiaomi Mi 8 Lite ला चीनमध्ये Mi 8 Youth edition नावाने लाँच केलं आहे. सप्टेंबर महिन्यात एका कार्यक्रमा दरम्यान कंपनीने एमआय8 यूथच्या तीन स्टोरेज वेरिएंटला लाँच केलं आहे. यामध्ये 4GB RAM + 64GB, 6GB RAM + 64GB और 6GB RAM + 128GB यांचा सहभाग आहे.
कंपनीने आता या हँडसेटच्या चौथ्या वेरिएंटला देखील लाँच केलं आहे. ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनला चीनी मार्केटमध्ये लाँच केलं आहे. हा स्मार्टफोन 16 नोव्हेंबरच्या सेलमध्ये उपलब्ध होणार आहे.
कंपनीने एमआय 8 यूथच्या नव्या वेरिएंटची किंमतबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, याची किंमत 6 जीबी रॅम/ 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची घोषणा 1,999 चीनी युआन म्हणजे जवळपास 21,200 रुपये आहे.
कंपनीने या फोनमध्ये 6.26 इंच एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर दिले आहे. यामध्ये ड्युअल कॅमरा सेटअर दिला आहे. ज्यामध्ये 12 सोबतच 5 मेगापिक्सर सेन्सर दिला आहे. फ्रंटमध्ये 24 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. ब्ल्यूटूथ 5.0 झीरा असून बॅटरी 3550 एमएएच असणार आहे.