नवी दिल्ली : दुचाकी निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या यामाहा कंपनीने शुक्रवारी आपल्या नव्या आणि दमदार बाईकचं लॉन्चिंग केलं आहे.
कंपनीच्या प्रसिद्ध एफजे सीरिजला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ही नवी बाईक लॉन्च केली आहे. या नव्या बाईकमध्ये 149 CC चं एफझेडएस-एफआय (FZ-S FI) एडिशन आहे.
या बाईकमध्ये 149 CC चं एअरकुल्ड फोर स्ट्रोक असलेलं इंजिन देण्यात आलं आहे.
बाईकच्या नव्या व्हेरिएंटमध्ये 220 एमएम आणि पुढील बाजुला 282 एमएमचे हायड्रॉलिक सिंगल ब्रेक देण्यात आले आहेत. या सिस्टममुळे बाईकचा स्पीड कंट्रोल करण्यास मदत होणार आहे.
बाईकच्या नव्या व्हेरिएंटमध्ये ग्राफिक्सलाही अपडेट करण्यात आलं आहे. यामाहा FZ-S 150 ते 160 cc सेगमेंटमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध सेलर्सपैकी एक आहे. या बाईकला सुझुकी जिक्सर, बजाज पल्सर NS 160 आणि होंडा सीबी होर्नेट 160 आर या बाईक्सची टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीने या बाईकच्या बाहेरील भागात जास्त बदल केले नाहीयेत. मोटरसायकलमध्ये स्पोर्टी एलॉय व्हील डिझाईन देण्यात आली आहे. 2018 Yamaha FZ-S मध्ये देण्यात आलेल्या 149 CC एअर कुल्ड फ्यूल इंजेक्टेड सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8000 Rpm वर 13 bhp ची पावर आणि 6000 Rpm वर 12.8 Nm टॉर्क जनरेट करतं. या बाईकला 5 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलं आहे.
यामाहाच्या इंजिनमध्ये ब्लू कोअर टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने चांगला मायलेज देण्यास मदत होणार आहे. सस्पेंशनसाठी फ्रंटला टेलिस्कोपिक फॉर्स आणि पाठीमागे मोनोशॉक सेटअप देण्यात आलं आहे.
यामाहा नव्या जनरेशनची YZF-R15 ही बाईक याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ऑओ एक्सपो शोमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील एक्स शो रुममध्ये या बाईकची किंमत ८६,०४२ रुपये आहे.