मोफत इलेक्ट्रिक स्कूटर हवीय? मग ही बातमी तुमच्यासाठीच

ओलाची तपकिरी रंगाची स्कूटर ग्राहकांना मोफत मिळणार असून आतापर्यंत 2 लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आहे.

Updated: May 23, 2022, 09:14 AM IST
मोफत इलेक्ट्रिक स्कूटर हवीय? मग ही बातमी तुमच्यासाठीच title=

मुंबईः ओला इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल आपल्या ग्राहकांना एक जबरदस्त ऑफर दिली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही मोफत ओला स्कूटर घेऊ शकता. ओलाची तपकिरी रंगाची स्कूटर ग्राहकांना मिळणार असून आतापर्यंत 2 लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आहे. आणखी 10 ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून ही धमाकेदार ऑफर दिली आहे मात्र त्यासाठी फक्त एक छोटीशी अट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एका चार्जमध्ये तुमची स्कूटर 200 किमी अंतर चालवायची आहे. जे लोक ही अट पूर्ण करतील अशा लोकांना ही स्कूटर फ्रीमध्ये घरी घेऊ जाता येणार आहे.  जून 2022 पासून या मोफत स्कूटरचं वितरण करण्यात येईल

भाविश यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, लोकांचा उत्साह पाहाता एका चार्जमध्ये ही स्कूटर 200 किमी अंतर चालवणाऱ्या आणखी 10 लोकांना आम्ही ही स्कूटर फ्रीमध्ये देऊ. आमच्याकडे असे 2 ग्राहक आहेत ज्यांनी ही अट पूर्ण करून मोफत स्कूटर मिळवली आहे. एका ग्राहकाने MoveOS 2 आणि एकाने 1.0.16 वर हा पराक्रम केला.

भाविशच्या या ट्विटनंतर आणखी एका ग्राहकाने एका चार्जमध्ये 200+ किमीचा टप्पा पार केला आहे. पूर्वेश प्रभू नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने स्कूटरच्या डिजिटल मीटरचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि सांगितले की त्याने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.