वॉशिंग्टन : असं म्हणतात की एक फोटो हजार शब्द व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोटो हा त्याच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करत असतो.
फोटोतून अनेक गोष्टी समोर येतात मग त्या वेळेचा आपला मूड, त्यावेळेच्या आठवणी आणि बरंच काही. असा एक रिसर्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये सोशल मीडियावरील फोटोवरून ती व्यक्ती डिप्रेस आहे की नाही हे सांगण्यात येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन लोकप्रिय सोशल मीडिया माध्यमांचा यामध्ये समावेश आहे. ही दोन माध्यम आता सांगणार तुम्ही डिप्रेस आहात की नाही. शास्त्रज्ञांनी यासाठी एक खास कॉम्प्युटर प्रोग्राम तयार केला आहे. आणि असंही सांगण्यात येतंय की हा प्रोग्राम डॉक्टरपेक्षा अधिक प्रभावशाली आहे. असं सांगितलं जातंय की, हा प्रोग्राम डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांबद्दल ७०% खरी माहिती देणार आहे.
अमेरिकेच्या वर्मोंट युनिव्हर्सिटीच्या क्रिस्टफर डेनफोर्थ यांनी याबाबत सांगितलं आहे की, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काही लोकांच कायम विश्लेषण केलं आहे. आणि त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे की काही लोकं डिप्रेशनचे शिकार बनले आहेत. त्यांच्या फोटोजचे रंग अतिशय गडद होते. त्या फोटोंवर तशा कमेंट देखील होत्या. आणि त्यामध्ये अनेक फोटो असून फिल्टरचा वापर केला होता.
त्यांनी सांगितलं की, फिल्टर फोटो ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी वापरला जातो. डिप्रेशनमध्ये राहणाऱ्या लोकांनी सामान्य लोकांपेक्षा अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत. ऑनलाइन सोशल डायलॉग कल्चर वाढल्यामुळे मानसिक आणि शारिरीक आजारांची लागण झाली आहे. याची सुरूवाती ओळख एल्गोरिथमपासून होते. संशोधकांनी सोशल मीडियाच्या अॅपवरील १६६ यूझर्सच्या ४३,९५० फोटोंचं निरीक्षण करुन विश्लेषण करण्यासाठी या कम्प्युटर प्रोग्रामचा वापर केला गेला. यामध्ये ७१ लोकांच्या वैद्यकीय तपासणीनंतर ते डिप्रेशनमध्ये असल्याचेही निदर्शनास आले. ‘ईपीजे डाटा सायन्स’ या मॅगझिनमध्ये हे संशोधनात्मक विश्लेषण प्रकाशितही झाले आहे.