मुंबई : झी ग्रुपच्या डिजिटल शाखा झी डिजिटलने एप्रिल 2021 मध्ये आपला सगळ्या जुन्या विक्रमांना मागे टाकत एक नवीन विक्रम नोंदविला आहे. गेल्या महिन्यात, झी डिजिटलने मंथली एक्टिव्ह यूझर्सची 300 मिलियन संख्या ओलांडली आहे, जी एक मोठी गोष्ट आहे. झी डिजिटल 20 ब्रॅन्ड्सचा एक गट आहे ज्यामध्ये 12 भाषांमध्ये एकूण 31 साइट्स आहेत. गेल्या दोन वर्षात कंपनीने 4 पटीं पेक्षा जास्त वाढ केली आहे.
जिथे एप्रिल 2019 मध्ये झी डिजिटलच्या साइटवर एकूण यूझर्सची संख्या 75 मिलियन होती. 2 वर्षात ती वाढून एप्रिल 2021 मध्ये 310 मिलियन झाली आहे. या वाढीसाठी कंपनीच्या सर्व ब्रँडने आपले योगदान दिले आहे. इंडिया डॉट कॉमने 11 पट वाढ नोंदविली तर, झी न्यूजने 3.4 पट वाढ नोंदवली आहे. ग्रुपच्या एंटरटेनमेंट वेबसाइट बॉलिवूड लाइफने 5.2 पट वाढ केली आहे, तर WION ने 7.8 पट वाढ केली आहे.
झी डिजीटलच्या नव्या विक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत या समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित चड्ढा म्हणाले, "मागील दोन वर्षात देशातील 450 मिलियनहूनही अधिक बातम्या आणि मनोरंजन इंटरनेट यूझर्सना आमच्याशी जोडण्याचा आमचा प्रयत्न होता आणि निकाल आपल्या समोर आहे. डिजिटल कंटेन्टचे भविष्य 3 'व्ही' वर टिकले आहे. हे 'व्ही' म्हणजे व्हिडीओ, व्हरऩ्याक्युलर भाषा (भाषा) आणि व्हॅइस आहे. या सगळ्यावर आमचे लक्ष आहे."
"प्रोडक्शनमध्ये व्हिडीओ कंटेन्टवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि मजबूत व्हिडीओ इन्फ्रास्ट्रक्चरमुळे, व्हिडीओंमध्ये बरीच वाढ झाली आहे. 2019 मध्ये कंपनीचे 200 मिलियन व्हीव्स होते, परंतु आते ते वाढून 2020 मध्ये अडीच अब्जांपेक्षा जास्त झाले आहेत. 2020 च्या लॉकडाऊन दरम्यान आम्ही झी न्यूजसाठी ओटीटी अॅप्स लाँच केला. जेणेकरुन ओटीटीवर वाढणाऱ्या प्रेक्षक वर्गाला आम्ही आमच्या प्लॅटफॅार्मवर आणू शकू.
आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मच्या 8 ब्रॉडकास्ट ब्रँड आणि ओडिया, पंजाबी, उर्दू यासह एकूण 3 प्रादेशिक भाषा चॅनेल लाँच केले आहेत. याचा परिणाम म्हणून व्हिडीओ आणि भाषिक मार्केटमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे आणि आम्हाला आणखी पुढे जायचे आहे."
गेल्या 2 वर्षात झी डिजिटलने आपल्या सर्व ब्रॉडकास्टिंग चॅनलचे डिजिटल प्लॅटफॉर्म बाजारात आणले आहेत. यामध्ये झी. हिंदुस्तान, झी. मध्य प्रदेश-छत्तीसगड, झी राजस्थान, झी. बिहार-झारखंड, झी. उत्तर प्रदेश-उत्तराखंड, झी. ओडिशा, झी. सलाम, झी. पंजाब, झी. हरियाणा, झी. हिमाचल यांचा समावेश आहे. त्याशिवाय देशाच्या दक्षिण भागात पोहोच वाढवण्यासाठी कंपनीने तमिळ, तेलगू, मल्यालम आणि कन्नड अशा भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म बाजारात आणले आहेत.
#ZEEDigital has become the first media & entertainment business in India to launch #ProgressiveWebApps for 13 of its national and regional news brands. @_rohitchadda #NewZeeDigital #PWA https://t.co/RVPlpTgPYS
— India.com (@indiacom) April 26, 2021
मोबाईल फर्स्ट अप्रोच बद्दल बोलताना रोहित चड्ढा म्हणाले, "आमचे 95% यूझर्स मोबाईलवर आहेत, म्हणून आम्ही मोबाईल फर्स्ट ला लक्षात घेऊन सर्व डिझाइन बनवतो. आमच्याकडे 4 प्रमुख ब्रँड आहेत, फ्लॅगशिप डिजिटल ब्रँड इंडिया डॉट कॉम, वेगाने वाढत असलेले राष्ट्रीय हिंदी न्यूज ब्रँड झी हिंदुस्तान, आमचा नंबर 1 बंगाली न्यूज ब्रँड झी 24 घंटा आणि नंबर 1 बिझिनेस न्यूज ब्रँड झी बिझनेस यांनी मोबाईल अॅप्स देखील लाँच केले आहेत. यादरम्यान, आम्ही WION, झी न्यूझ अॅपच्या यूआय / यूएक्स आणि परफॉर्मेंसमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. झी जगातील सर्वात जास्त रेट केलेल्या न्यूज अॅप्स बनले आहे. गुगल प्ले स्टोअरवर, WION अॅपला 4.9 स्टार रेटिंग मिळाली आहे, तर झी न्यूजला 4.7 स्टार्स रेटिंग मिळालं आहे."
अलीकडे, झी डिजिटलने आपल्या 13 राष्ट्रीय आणि स्थानिक न्यूज ब्रँडसाठी सर्वात मोठा प्रोग्रेसि वेब अॅप लाँच केला आहे. याद्वारे, 9 भाषांमध्ये मोबाइलवरील बातम्या वाचण्याचा यूझर्सचा अनुभव अधिक सुखकर होईल आणि कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात, रिअल टाइम बातम्यांसह यूझर्स कनेक्ट राहू शकतील. या वर्षाच्या सुरूवातीला, इंडिया डॉट कॉमची मोबाइल साइट नवीन अंदाजात लाँच केली गेला होता. यामुळे यूझर्सना चांगला अनुभव मिळाला आणि परिणामी या ब्रँडची बरीच वाढ झाली आहे.