Pune Cirme News: पुण्यामधील मुळशी तालुक्यातील दत्तावाडीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात घुसून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला विवस्त्र करुन त्याचे फोटो काढण्यात आले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी 4 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याला ताब्यात घेतले आहे. त्यातील 2 अल्पवयीन मुले ही सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी पिडीत मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत मुलगा दत्तवाडी परिसरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी इयत्तेत शिक्षण घेतो. तो 4 दिवसांपुर्वी घरी जात असताना तळजाई येथे आरोपी आणि इतर काही जणांमध्ये भांडणे सुरु होती. यावेळी पिडीत मुलगा ही भांडणे पहात थांबला होता. यामुळे आरोपींचा असा समज झाला की त्यानेच आपल्याला मारायला मुले पाठवली आहेत. यानंतर आरोपींनी 2 तारखेला पिडीत मुलाच्या महाविद्यालयात दाखल झाले. तेथून पिडीत मुलाला दुचाकीवर दोघांमध्ये जबरदस्तीने बसवून आंबेगाव परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले.
आरोपींनी पिडीत मुलाला, 'काल झालेल्या भांडणातील आरोपींना घेऊन ये’ असा दम भरला. तसेच धारदार हत्यार त्याच्या गळ्याला लावून ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याला विवस्त्र करुन फोटो काढले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कामठे करत आहेत.