शेंबडा पोरगाही सांगेल, राज्यात महायुतीची सत्ता येईल- फडणवीस

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा भाजपला उलट फायदाच होतो.

Updated: Oct 15, 2019, 06:47 PM IST
शेंबडा पोरगाही सांगेल, राज्यात महायुतीची सत्ता येईल- फडणवीस title=

पुरंदर: आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता येईल, ही गोष्ट पाच वर्षांचा शेंबडा पोरगाही सांगेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी पुरंदर येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी फडणवीसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा समाचार घेतला. 

राज्यात निवडणूक असताना राहुल गांधी बँकॉकला फिरत होते. त्यांना माहिती आहे की, महाराष्ट्रात डोकं आपटून काही उपयोग नाही. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा भाजपला उलट फायदाच होतो. एखाद्या उमेदवाराला लीड दुप्पट करायचा असेल तर राहुल गांधी यांची एक सभा लावून टाका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडविली. 

मोदी म्हणजे अंबानी-अदानींचे लाऊडस्पीकर- राहुल गांधी

तत्पूर्वी राहुल गांधी यांनीही मंगळवारी वर्धा येथील प्रचारसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी जिथे जातात तिथे लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. कधी ते ३७० वर बोलतात, इतरवेळी वेगळा मुद्दा असतो. मात्र, स्थानिकांचे आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यावर मोदी कधीच बोलणार नाही, असे राहुल यांनी सांगितले. 

मी सरकार हलत झुलत ठेवलं नाही, जे करायचं ते उघडपणे केले- उद्धव ठाकरे