पुणे: हिंदू समाज जागृत झाला तर गाईंची कत्तल थांबेल, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते शनिवारी पुण्यात गोसेवा पुरस्कार समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, गाय कापली जाते, ही खरी समस्या नाही. तर गायीला माता मानत असूनही कोणीही गाय पाळायला तयार नाही, हे समस्येचे खरे मूळ आहे. आज देशात केवळ ४५ हजार गायी शिल्लक आहेत. मात्र, त्यांना कसे जगवायचे हा प्रश्न उभा ठाकल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले.
गोव्यातील भटक्या गायींना मांसाहाराची चटक
पाश्चिमात्य जगात गाय उपभोगाची वस्तू मानली जाते. परंतु, गाय ही निसर्ग, माती आणि मनुष्याच्या स्वभावावर परिणाम करत असते. आपण केवळ दुधासाठी गाय पाळत नाही. गाय, गोमूत्र आणि शेण या माध्यमातून सभोवतालचं पावित्र्य राखले जाते. मात्र, सध्या गोसंवर्धनाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजेत.
एक गाय उधार घेतली खरी....आज कोट्यवधींचा मालक
तुरुंगात गोपालन केल्याने गोसेवा करणाऱ्या कैद्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेत घट होते. त्यामुळे गोपालन केलं पाहिजे, असं आवाहन करतानाच गायीला कत्तलखान्यात पोहोचवणारेही हिंदूच आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाज जागृत झाला तर कोणीही गाय कापायला पाठवणार नाही. आज हिंदूच लोक गाय कापायला पाठवतात. अनेक ठेकेदार हिंदूच आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक घर गोपालक झाले पाहिजे. तरच गोपालनाची समस्या मुळापासून संपुष्टात येईल, असे भागवत यांनी सांगितले.