शिवशाही बस दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, २४ जखमी

ही शिवशाही बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती.

Updated: Nov 25, 2019, 03:22 PM IST
शिवशाही बस दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, २४ जखमी

पुणे: कात्रज घाट परिसरातील शिंदेवाडी गावाजवळ सोमवारी दुपारी शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात शिवशाही बस ५० फूट खोल दरीत कोसळल्याचे समजते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, अपघातात २० प्रवाशी जखमी झाले आहेत. या सर्वांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ही शिवशाही बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्यावेळी बसमध्ये ४० प्रवाशी होते. कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडी या गावाजवळ असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.