मुंबई : थंड पाणी किंवा आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ खात असताना अनेक वेळा लक्षात येत असतं की, आपले दात दुखतायत, तेव्हा आपले दात किडलेले असतात, किंवा किड लागण्यास सुरूवात झालेली असते. डेंटीस्टकडे जाऊन आपण दात दाखवतो, किडलेले दात काढण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र दात काढण्याआधी बिनपैशांचा साधा सोपा उपाय नक्की करून पाहा. चिमुटभर खायचा चुना घ्या, आणि चिमुटरभर तुरटी (फिटकी)ची पावडर घ्या. चुना+तुरटी+दोन थेंब पाणी घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापसाच्या मदतीने दातांना लावा.
ही पेस्ट लावण्याआधी हे लक्षात घ्या की पेस्ट लावण्याआधी तोंड आ करा, वरील दात खालील दातांना काही मिनिटे लागू देऊ नका, जिभही नाही. यामुळे लाळ वाहून येईल, याच्यात किड वाहून जाईल. हे दुसऱ्या दिवशीही करा. म्हणजे राहिलेली किड देखील निश्चित निघून जाईल. ही पेस्ट कापसाने भरपूर लावा. व्यवस्थित लावा.