महिलांनो... इतरांनी तुमची काळजी करण्यापेक्षा या Tips वापरून आधी स्वत:ला Refresh करा

महिलांनी स्वतःच्या गरजांनाही प्राधान्य दिले पाहिजे. पण, आता ते कसं...? तर आज जाणून घेऊया त्यासाठीच्याच काही टीप्स... 

Updated: Oct 8, 2022, 01:29 PM IST
महिलांनो... इतरांनी तुमची काळजी करण्यापेक्षा या Tips वापरून आधी स्वत:ला Refresh करा  title=
Ladies Refresh yourself first by using these tips instead of letting others worry about you nz

self-care tips for women: दिवसभर ऑफिस आणि घरातील कामांत महिला इतक्या व्यस्त असतात की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण, स्वत:ची काळजी घेणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी घेतल्याने तुम्ही शारीरिक, भावनिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. महिलांनी स्वतःच्या गरजांनाही प्राधान्य दिले पाहिजे. पण, आता ते कसं...? तर आज जाणून घेऊया त्यासाठीच्याच काही टीप्स... (Ladies Refresh yourself first by using these tips instead of letting others worry about you nz)

1. आहारात आवश्यक  बदल करा- 
स्वत:ची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारात योग्य बदल करणं. तुम्ही तुमच्या वयानुसार दररोज तुमच्या आहारात सर्व पौष्टिक घटकांचा समावेश करत आहात का? नसेल तर आजपासूनच करायला सुरुवात करा. तसेच रोज व्यायाम, योगासनं करायला विसरू नका.

2. स्वतःवर प्रेम करायला शिका - 
तुम्ही जसे आहात तसं स्वतःवर प्रेम करायला शिका. तरच तुम्ही स्वतःला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आधार देऊ शकता. आरशासमोर उभे राहा आणि तुम्हाला स्वतःबद्दल आवडत असलेल्या गोष्टी सांगा. दररोज स्वत:ची प्रशंसा करा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. 

आणखी वाचा - Health Tips : 'या' सोप्या उपायांनी तुमच्याही रक्तातील साखरेची पातळी होईल कमी...

3. तुमच्या गरजांकडेही लक्ष द्या- 
तुमच्या स्वतःच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.  स्वतःसोबत वेळ घालवा. तुमचा छंद पूर्ण करा. यामुळे तुम्हाला मानसिक आराम मिळेल. पुस्तके वाचा, टीव्हीवर सकारात्मक, मजेदार कार्यक्रम पहा. स्वतःसाठी फिटनेस दिनचर्या तयार करा. 

4. तुमच्या कामातून ब्रेक घ्या- 
तुम्ही सतत काम करत असाल तर काही दिवस कामातून ब्रेक घेऊन एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. 

5. गाणी ऐकून मूड फ्रेश करा- 
तुम्ही अडचणीत, तणावाखाली असाल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून आवडतील ती गाणी ऐका. काही निवांत क्षण एकटे घालवा. स्वत: ची काळजी घेण्यासाठी ही एक अतिशय सोपी Activity आहे.

आणखी वाचा - Online counseling ची झपाट्याने वाढतेय क्रेझ? जाणून घ्या नुकसान आणि फायदे