मदर्स डे: ब्रेस्ट फीडिंग करतानाचा अभिनेत्रीचा फोटो व्हायरल

 पद्म लक्ष्मीने असे फोटो शेअर करण्यापूर्वी साऊथ इंडियन एक्ट्रेस गिलू जोसेफ हिनेही ब्रेस्ट फीडिंग करतानाचे फोटोशूट एका मासिकासाठी केले होते

Updated: May 13, 2018, 03:11 PM IST
मदर्स डे: ब्रेस्ट फीडिंग करतानाचा अभिनेत्रीचा फोटो व्हायरल

मुंबई:  आज १३ मे. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृत्व दिन म्हणून साजरा केला जात आहे. बॉलिवूड सेलिब्रेटीही आपापल्या पद्धतीने मातृत्वदिन साजरा करत आहेत. दरम्यान, नुकतीच आई झालेल्या एका अभिनेत्रीने मातृत्व दिनाच्या एक दिवस आगोदर ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. पद्म लक्ष्मी असे या अभिनेत्रिचे नाव असून, तिने बाळाला स्तनपान (ब्रेस्ट फीडिंग) करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोवरून नेटीजन्सनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.

महिला मल्टीटास्कर असतात

ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये पद्म लक्ष्मी एका हाताने चेहऱ्यावर मेकअप करत आहे. तर, तिच्या दुसऱ्या हातात बाळ कडेवर घेऊन ती बाळाला स्तनपान करताना दिसत आहे. महिला या किती मल्टीटास्कर असतात हे पद्म लक्ष्मी दाखवू इच्छिते. दरम्यान, हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

पद्म लक्ष्मीच नव्हे तर, इतरही अनेक अभिनेत्रींनी शेअर केले फोटो

दरम्यान, पद्म लक्ष्मीने असे फोटो शेअर करण्यापूर्वी साऊथ इंडियन एक्ट्रेस गिलू जोसेफ हिनेही ब्रेस्ट फीडिंग करतानाचे फोटोशूट एका मासिकासाठी केले होते. अशा प्रकारचे फोटोशूट करतना महिला कोणत्याही ठिकाणी ब्रेस्ट फीडिंग करण्यासाठी स्वतंत्र आहेत असे सांगण्याचा तिचा हेतू होता. पण, तिच्या या पावलावर अनेकांनी टीका केली.  

 अभिनेत्री लीजा हेडेन हिनेही ब्रेस्ट फीडिंग करतानाचा फोटो शेअर केलेला आहे.