इस्लामाबाद: पाकिस्तानच्या एका वरिष्ठ आर्मी कमांडरने दावा केला आहे की, त्यांचा देश (पाकिस्तान) इस्त्राईलची केवळ १२ मिनिटांत राखरांगोळी करू शकतो. जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन जनरल जुबेर महमूद हयात यांनी हे विधान केले आहे. हयात म्हणतात की, इस्त्राईलने आमच्या भूभागावर आक्रमण करण्याचा केवळ प्रयत्न जरी केला तर, आम्ही केवळ १२ मिनिटांत यहूदींच्या राजवट केवळ १२ मिनिटात राखरांगोळी करू.
AWDच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जनरल महमूद हयात यांनी म्हटले आहे की, त्यांचा यहूदींना विरोध नाही. पण, दुसऱ्या देशाला घाबरून चिंतीत होण्यापेक्षा पाकिस्तानने स्वत:त बदल करणे गरजेचे आहे. पॉलिस्टाईनच्या समर्थनार्थ बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी या मुद्द्यावर आजिबात सहमत नाही. की, यहूदी आमचे (पाकिस्तान) दुश्मन आहेत. तिरस्कारातून केवळ तिरस्कारच जन्माला येतो. मानवी अधिकारांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.'
त्यांनी सांगितले की, इतिहास साक्षीदार आहे की, इस्त्रायलने पाकिस्तानसोबत विश्वास निर्माण केला नाही. या वक्तव्याच्या संदर्भासाठी त्यांनी एका यहूदी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या इस्त्रायलच्या संस्थापक बन गुरियन यांच्या लेखाचा संदर्भ दिला. ज्यात गुरियन यांनी लिहिले होते की, 'वर्ल्ड जियोनिस्ट मुव्हमेंटला पाकिस्तानातून निर्माण होणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात. पाकिस्तान यहूदिंचा तिरस्कार करतो आणि अरबस्तानला जवळ करतो. पण, अरबचा मित्र स्वत:च अरबपेक्षा कितीतर धोकादायक आहे'
पाकिस्तानी कमांडरने सांगितले की, 'ईस्त्रायल मानतो की, सर्व पॉलेस्टीनी दहशतवादी आहेत. आणि ते इस्लामिक कट्टरवादी आणि आत्मगातकी दहशतवाद्यांच्या धोक्यापासून स्वत:चा बचाव करू इच्छितात. पण, वास्तव भलतेच वेगळे आहे.'