Viral News : विचित्र आणि विश्वास न बसणारी एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे वैज्ञानिक असो डॉक्टर असो सगळे चक्रावले आहेत. ही घटना सोशल मीडियावर झपाट्याने वाऱ्यासारखी पसरत आहे. एका 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विचित्र आहे. ही तर सर्वसामान्य बाब आहे, पण या घटनेत एक ट्वीस्ट आहे. या तरुणीने जुळ्यांना जन्म तर दिला पण या दोघांचे वडील हे वेगवेगळे (different biological dads) आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात. (Brazil Twins Baby)
मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली तेव्हा त्या जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे असल्याचा खुलासा झाला. या रिपोर्टनंतर डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली. हा वैज्ञानिक चमत्कार आहे की अजून काही हे त्यांच्याही समजण्या पलिकडील होतं. तरुणीसोबत असलेल्या व्यक्ती हा तिच्या जुळ्या मुलांचा बाप असल्याचं सांगण्यात आलं होतं. मुळात डीएन चाचणी नंतर जुळ्या पैकी एका मुलाचा डीएन हा त्या व्यक्तीशी जुळत होता पण एका मात्र नाही. त्यामुळे त्या मुलाचे वडील कोण असा प्रश्न उपस्थित झाला. तरुणीच्या जोडीदाराला हे कळताच त्याला मोठा धक्का बसला आणि आपल्या जोडीदाराने आपल्यासोबत विश्वासघात केल्याचा संशय त्याचा मनात आला. (19 year old woman delivers twins with different biological dads viral news treading now)
'डेली रेकॉर्ड' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ही घटना ब्राझीलमधील आहे. खरं तर त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. तरुणी आपल्या विश्वासघात करेल असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. विशेष म्हणजे प्रेग्नेंसी पिरेडमध्ये तिला कुठल्याही समस्या झाल्या नाहीत. जुळ्या मुलांच्या जन्मानंतर ती निरोगी आणि एकसारखी होती. त्यामुळे या दोघांपासून कोणीही म्हणणार नाही की त्यांचे वडील हे वेगवेगळे असतील.
या विचित्र प्रकरणाच्या खोलात जाण्याचा निर्णय रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला. कारण हे त्यांच्याही समजण्यापलिकडलं होतं. त्यावेळी तरुणीने जे सांगितलं त्यानंतर सगळ्यांच धक्का बसला. झालं असं की एकाच दिवशी त्या तरुणीने दोन पुरुषांसोबत सेक्स केला. त्यामुळे हा दुसरा मुलगा त्या तरुणाचा असू शकतो असं डॉक्टरांना वाटलं. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी त्या दुसऱ्या तरुणाला डॉक्टरने बोलवून घेतलं आणि त्याची डीएनए चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट आल्यावर सगळ्यांना धक्काच बसला. कारण या तरुणाचा डीएनए त्या दुसऱ्या मुलाशी जुळला जात होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही मुलांच्या जन्म प्रमाणपत्रांवर त्या तरुणीसोबत असलेल्या पहिल्या जोडीदाराचेच नाव आहे. सत्य कळल्यानंतरही त्या व्यक्तीने तरुणी आणि दोन्ही मुलांचा सांभाळण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान डॉक्टरांनुसार हा Heteropaternal Superfecundation चा प्रकार आहे. ते म्हणाले की, संपूर्ण जगात आतापर्यंत अशी 20 घटन समोर आली आहे.