भीती घालवण्यासाठी लाईव्ह टीव्हीवर अमेरिकेचे 3 माजी राष्ट्राध्यक्ष घेणार कोरोनाची लस

कोरोना लस आणि लोकांमधील अंतर कमी होत चाललं आहे.

Updated: Dec 5, 2020, 06:20 PM IST
भीती घालवण्यासाठी लाईव्ह टीव्हीवर अमेरिकेचे 3 माजी राष्ट्राध्यक्ष घेणार कोरोनाची लस

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना आता कोरोना लस लवकरच येण्याची चिन्ह आहेत. कोरोनामुळे अनेकांनी आपलं जीव गमावले. लोकांमध्ये अजूनही कोरोनाची भीती कायम आहे. पण आता कोरोना लस आणि लोकांमधील अंतर कमी होत चाललं आहे. पुढील काही दिवसांत यूकेमध्ये ही लस दिली जाणार आहे. त्यातच अमेरिकेतून एक महत्त्वाची बातमी आली आहे. 

3 माजी राष्ट्रप्रमुखांचा स्तुत्य निर्णय

कोरोनाची लस अमेरिकेपर्यंत पोहोचण्यापूर्वी अमेरिकेच्या तीन माजी राष्ट्राध्यक्षांनी ही लस घेण्यासाठी प्रशंसनीय निर्णय घेतला आहे. बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि बिल क्लिंटन, हे तीन माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ही लस लाईव्ह लावून घेणार आहेत. ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर होतील.

लोकांची भीती दूर करण्याचा हेतू

जरी लोकांना कोरोना लसीची खूप गरज आहे आणि जगभर त्याची प्रतीक्षा आहे, परंतु बर्‍याच देशांमध्ये कोरोनाच्या लशीची भीती लोकांच्या मनात दिसून येत आहे. या भीतीवर मात करण्यासाठी अमेरिकेचे तीन माजी अध्यक्ष त्यांच्या शरीरात लाइव्ह टीव्हीवर ही लस लावतील जेणेकरुन लोक या लसीवर विश्वास ठेवू शकतील. अलीकडेच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे एक विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, अमेरिकेचे अव्वल डॉक्टर अँथनी फौसीवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा. ओबामा म्हणतात की, 'ही लस सुरक्षित आहे, म्हणून मी ती घेणार आहे.'

ओबामांनी असे म्हटले होते की, लाईव्ह टीव्हीवर रांगेत उभे राहून आपल्याला ही लस घ्यायची आहे, तर माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांनीही लोकांच्या मनातील प्रत्येक शंका दूर करण्यासाठी आनंदाने लस कॅमेर्‍यासमोर घेण्याचा निर्णय घेतला आहे.