इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, ३५ जणांचा मृत्यू

 सुलेमानी यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ लोकांचा मृत्यू झाला तर ४८ जण जखमी झालेत.  

Updated: Jan 7, 2020, 05:28 PM IST
इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, ३५ जणांचा मृत्यू title=

केरमान : इराणचे लष्करी लेफ्टनंट जनरल कासिम सुलेमानी हे अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले होते. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ लोकांचा मृत्यू झाला तर ४८ जण जखमी झालेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंडी गर्दी जमा झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. कासिम सुलेमानी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. यावेळी चेंगराचेंगरी झाली, असे वृत्त इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिले आहे. यात ३५ लोक ठार झाल्याचे म्हटले आहे.

इराणचा  प्रमुख लष्करी कमांडर कासिम सुलेमानी होते. अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जनरल कासिम सुलेमानींचा मृत्यू झाला. सुलेमानी यांच्या मूळ गावी केरमानमध्ये मंगळवारी सकाळी अंत्ययात्रा निघाली होती. त्या दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. दरम्यान, सोलेमानी यांच्या अंत्यसंस्कारात एक दशलक्षाहून अधिक लोक उपस्थित होते. 

केरमानधील लेफ्टनंट जनरल कासिम सोलेमानी यांच्या अंत्यसंस्कार समारंभादरम्यान चेंगराचेंगरीत पुष्कळ लोकांचा मृत्यू झाला, असे वृत्त प्रेस टीव्हीने दिले आहे. कासिम सुलेमानी इराणमध्ये लोकप्रिय होते. त्याच्याबद्दल सर्वसमान्य इराण जनतेमध्ये आदराची भावना होती. शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. यात सुलेमानी ठार झाले होते.