Zombie Virus Revived : कोरोना महामारीच्या (Corona Virus) धक्क्यातून जग आता कुठे सावरु लागलंय. पण त्यातच रशियातून (Russia) एक भयंकर बातमी समोर आलीय. रशियन शास्त्रज्ञांनी तब्बल 48 हजार वर्षं बर्फाखाली (Frozen Lake in Russia) दबल्या गेलेल्या एका व्हायरसला (Virus) जिवंत केलंय. एका मोठ्या तळ्याशेजारी हा व्हायरस हजारो वर्षांपूर्वी दफन झाला होता, पण रशियन शास्त्रज्ञांनी या व्हायरसला जिवंत केल्यामुळे जगभरात भिती पसरलीय. विशेष म्हणजे फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी (French Scientists) रशियानं हा व्हायरस जिवंत केल्याचा दावा केलाय. फ्रान्सच्या शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार..
काय आहे झोम्बी व्हायरस?
रशियातील एका तळ्यात 48,500 वर्षांपूर्वी हा व्हायरस दबला गेला होता
पशू-पक्षी-मानव प्रत्येकावर या व्हायरसचा दुष्परिणाम होऊ शकतो
कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरू शकतो
पंडोराव्हायरस एडिमा (Pandoravirus yedoma) असं या व्हायरसचं वैज्ञानिक नाव आहे
2013मध्ये या व्हायरसचा शोध लागला होता
ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळल्यानं हा व्हायरस जगासमोर आला होता
कोरोनापेक्षा हा व्हायरस भयानक असू शकतो असा शास्त्रज्ञांचा दावा आहे
हे ही वाचा : चिंताजनक ! मुलींमध्ये सिगरेट पिण्याचं प्रमाण वाढलं, 13 ते 15 वयोगटातच व्यसनाधीन
ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) बर्फ वितळून या भयंकर व्हायरसच्या अस्तित्वाची जाणीव शास्त्रज्ञांना झाली होती. त्यात रशियन शास्त्रज्ञांनी या व्हायरसला बर्फातून बाहेर काढलंय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील बर्फ वितळतोय. अशा परिस्थितीत हा व्हायरस भूतलावर आला तर या व्हायरसशी सामना करण्यासाठी त्यावर संशोधन होणं आवश्यक आहे. त्याच उद्देशातून रशियन शास्त्रज्ञांनी या व्हायरसला बाहेर काढलंय. पण वुहानच्या एका छोट्या लॅबमधून जसा कोरोना व्हायरस बाहेर पडला तसा हाही व्हायरस बाहेर येण्याची भीती जगभरात व्यक्त केली जातेय.