अंतराळात अणुबॉम्ब फोडणार; पृथ्वी वाचवण्यासाठी संशोधकांचा भयानक प्रयोग

लघुग्रहाच्या धडकेपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी संशोधक एक प्रयोग करणार आहेत. अंतराळात अणुबॉम्बचा स्फोट केला जाणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 25, 2023, 09:03 PM IST
अंतराळात अणुबॉम्ब फोडणार; पृथ्वी वाचवण्यासाठी संशोधकांचा भयानक प्रयोग title=

Nuclear Bomb Blast In Space : पृथ्वीला सर्वात मोठा धोका आहो तो लघुग्रह आणि उल्कापिंडाचा. बेन्नू (bennu asteroid) नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेन झेपावत आहे. 159 वर्षानंतर बेन्नू  लघुग्रह पृथ्वीवर कोसळणार आहे. बेन्नू  लघुग्रह पृथ्वीवर धडकल्यास मोठा विध्वंस होवू शकतो. Bennu लघुग्रह पृथ्वीसाठी धोकायक ठरू शकतो. धोका टाळण्यासाठी संशोधक अंतराळात अणुबॉम्ब फोडणार आहेत. पृथ्वी वाचवण्यासाठी संशोधक हा भयानक प्रयोग करणार आहेत.

159 वर्षानंतर Bennu लघुग्रह पृथ्वीवर धडकणार 

159 वर्षानंतर अर्थात 24 सप्टेंबर 2182  Bennu हा  लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. हाच लघुग्रह पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरू शकतो. बहा लघुग्रह पृथ्वीला धडकल्यास 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे महाभयंकर विनाश होवू शकतो.  दरम्यान, दर 6 वर्षांनी   बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जात आहे.  बेन्नू लघुग्रहाच्या धडकेमुळे पृथ्वीवर निर्माण होणारे संकट टाळण्यासाठी NASA ची धडपड सुरु आहे. यासाठी लघुग्रह कोसळण्याआधीच Bennu लघुग्रहाचा तुकडा NASA ने पृथ्वीवर आणला आहे. या लघुग्रहाच्या तुकड्याचे संशोधक संशोधन करत आहेत. 

अंतराळात अणुबॉम्ब फोडल्यास काय होईल

बेन्नू लघुग्रहाची पृथ्वीवर धडकू नये यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठीच लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी (LLNL) च्या संशोधकांनी एक प्रणाली तयार केली आहे. न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. नासाचे संशोधक अंतराळात मोठा प्रयोग करणार आहेत.  पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्का तसेच लघुग्रह पृथ्वीपासून किती दूर आहेत. त्यांचा आकारमान किती आहे याचा अंदाज घेवून अणुबॉम्बच्या मदतीने त्यांना फोडले जाईल. यामुळे याचे लहान लहान तुकडे होवून ते अंतराळात फिरत राहतील. याशिवाय पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्का तसेच लघुग्रहांची दिशा बदलता येवू जेणेकरुन धडक टाळली जाईल यावर देखील संशोधक संशोधन करत असल्याचे संशोधन पथकाच्या प्रमुख भौतिकशास्त्रज्ञ मेरी बर्की  यांनी सांगितले. 
बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात नासाला यश मिळालंय. नासाच्या ऑसिरिस-रेक्स अवकाशयानातून पृथ्वीच्या कक्षेत 63 हजार मैलांवर हे नमुने सोडण्यात आले. सुमारे 250 ग्रॅमचे हे नमुने आहेत. उल्का, अंतराळातील वातावरण, सूर्यमाला यासंबंधीच्या संशोधनात उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 8 सप्टेंबर 2016 मध्ये ऑसिरिक्स-रेक्स अंतराळायानाचा प्रवास सुरु झाला होता. तब्बल 7 वर्षांनी अंतराळातून धूळ आणि दगडाचे नमुने या यानानं पृथ्वीवर पाठवलेत.