Viral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं?

Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात.

Updated: Dec 17, 2022, 11:03 PM IST
Viral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं? title=
File photo

Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात. परंतु सोशल मीडियावर मात्र मॅचच्या स्कोअर किंवा प्लेअरपेक्षा जास्त लाईव्ह मॅचमध्ये होणाऱ्या अनेक घटना व्हिडीओच्या स्वरूपात व्हायरल होत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर (social media) असे अनेक व्हिडीओही व्हायरल होताना आपण पाहतो. तेव्हा सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (live match video viral) व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ चक्क नोकराप्रमाणे नवरा आपल्या बायकोला मेकअप करण्यासाठी मदत करत आहेत. (a video goes viral on social media woman wears makeup while husband holds mirror for her)

कधी स्टेडियममध्ये जोरदार डान्स करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी चिअर करणाऱ्या चिअर गर्ल्सचा (cheer girls). अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर हे व्हायरल होतच असतात. त्यामुळे आपल्याला ते व्हिडीओ पाहण्याचा मोह काही आवरता येत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे नवरा-बायकोच (husband wife video live match) आगळंवेगळं नातं येथे हायलाईट होताना दिसत आहेत. या व्हिडीओ अनेक लोकांनी लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर जिंदगी गुलझार हैं या अकांऊटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की प्रेक्षकांमध्ये एक कपल बसलेलं आहे. जो एक खेळाडू आहे आणि अचानक एका माणसाच्या बाजूला बसलेली त्याच्या बायको मेकअप करून लागते. आणि तिला मेकअप करता यावा म्हणून तिच्या नवऱ्यानं त्याच्या हातात आरसा धरला होता. या व्हिडीओत ती मुलगी आपल्या डोळ्यांना आयलाईनर (eyeliner) लावताना दिसते आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकं या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. या व्हिडीओमुळे अनेकांनी नवरा-बायकोच्या प्रेमाचे दाखले देताना दिसत आहेत. या व्हिडीओत मात्र हा नवरा आपल्या बायकोला नीट मेकअप लावता यावा म्हणून तो नीट आरसा धरताना दिसत आहेत. काहींना हा रोमॅण्टिक व्हिडीओ वाटत आहे तर काहींना त्या नवऱ्याच्या एक्सप्रेशनवरच हसू येतं आहे. परंतु हा व्हिडीओ (video live match) कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे आणि तो व्हायरल केला आहे. 

पाहा व्हिडीओ - 

काही नेटकरी असं म्हणतायत की या व्हिडीओत (wife makeup in live match) आरसा दिसून नसून त्याच्या हातात एक मोबाईल फोन दिसत आहे. तर काहींना हा व्हिडीओ उगाच टाईमपास म्हणून काढला आहे असं वाटतं आहे. आज सध्या या व्हिडीओमुळे सगळीकडेच आनंदाचे वातावरण पसरले आहे.  या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युझरने हस्बंड ऑफ द इयर असे लिहिले आहे. पण तो मात्र तिच्या चेहऱ्याकडे अजिबात पाहत नव्हता, उलट त्यानं समोरची मॅच अजिबातच मिस केली नाही, असंच या व्हिडीओतून दिसत आहे.