तालिबानविरूद्ध लढण्यासाठी अफगानिस्तान वाढवणार स्पेशल फोर्सची संख्या

तालीबानच्या दहशतवादाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. तालीबानच्या क्रुरकृत्याची सर्वाधीक झळ बसते ती अफगानिस्तानला. म्हणूनच अफगानिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, अफगानिस्तान आता दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी स्पेशल फोर्सची संख्या दुपटीने वाढवणार आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 5, 2017, 04:51 PM IST
तालिबानविरूद्ध लढण्यासाठी अफगानिस्तान वाढवणार स्पेशल फोर्सची संख्या title=

नवी दिल्ली : तालीबानच्या दहशतवादाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. तालीबानच्या क्रुरकृत्याची सर्वाधीक झळ बसते ती अफगानिस्तानला. म्हणूनच अफगानिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, अफगानिस्तान आता दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी स्पेशल फोर्सची संख्या दुपटीने वाढवणार आहे.

अफगानिस्तानातील तालीबानवर निशाणा साधण्यासाठी सशस्त्र कमांडो आरपीजी ७ रॉकेट लॉचरचा मारा करत आहेत. हे कमांडो लष्कारतील सर्वात ताकदवान कमांडो म्हणून ओळखले जातात. अमेरिकेच्या लष्करी जनरलनेही म्हटले आहे की, अफगानिस्तानातील हे कमांडो तालीबान्यांना चिंतेत टाकू शकतात. अफगानिस्तानच्या स्पेशल ऑपरेशन्स कमांडोमध्ये (एसओसी) सहभागी होणारे हे नवे सैनिक लवकरच तालीबानसोबत नव्या युद्धाला सुरुवात करतील.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही अफगान भूमीवर अधिक सैन्य उतरवून हे युद्ध जिंकण्याची शपथ घेतली आहे.