मुंबई : काही लोक इतके विचित्र असतात की, ते कधी काय करतील याचा काही नेम नाही. अलीकडेच एका 28 वर्षीय मॉडेलने तिच्या काखेतील केसांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे विचित्र वाटत असलं, तरी आजकाल परदेशातील महिला अभिमानाने त्यांच्या अंगावरचे केस दाखवतात. एवढेच काय तर मॅगझीन कवर वरती देखील एका मॉडेलने काखेतील केस दाखवत फोटो शुट केले होते.
परंतु या महिलेची गोष्ट थोडी वेगळी आहे. खरंतर या महिलेनं आपल्या काखेतील केस विकून जवळ-जवळ 3 कोटी कमावले आहेत.
फेनेला फॉक्स असे या महिलेचं नाव आहे आणि ती मूळची वोर्सेस्टर मिडलँडची आहे.
फेनेलाला तिच्या काखेवरील केस आवडतात आणि त्यामुळेच फेनेलाला खूप प्रसिद्धी देखील मिळाली आहे. एडल्ट कंटेंट प्लॅटफॉर्मवर सामील होण्यापूर्वी फेनेला 2014 मध्ये कॅम गर्ल होती.
फेनेलाने तिच्या लैंगिक जीवनाबद्दल खुलासा करताना, म्हणाली की तिची लैंगिक जीवन खूपच वाईट आहे. कारण तिने 2017 पासून फक्त दोनदा सेक्स केले आहे.
खरंतर तिच्या काखेतील केसांमुळे तिच्या डेटिंग लाइफवर वाईट परिणाम झाला. परंतु असे असूनही, तिला तिच्या काखेतील केस काढायचे नव्हते.
फेनेलाने याबाबत सोशल मीडियावर सांगितले की, शरीराचे केस कापण्याबाबत पुरुषांवर कोणताही दबाव टाकला जात नाही. मग महिलांवर का? फेनेला म्हणाली की हे खूप मोठे दुहेरी मानक आहे, ज्याला आपण आव्हान दिले पाहिजे.
फेनेला म्हणाली, "केस न काढणे हे माझ्यासाठी पूर्णपणे जीवन बदलणारे होते आणि सर्व महिलांना त्यांच्या शरीराचे केस दाखवण्याची लाज वाटू नये अशी माझी इच्छा आहे."
फेनेला म्हणाली, 'सोशल मीडियावर लोक मला घृणास्पद, घाणेरडे आणि आळशी म्हणतात. याशिवाय मला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. त्याच वेळी, काही लोकांनी मला असेही सांगितले की मी नेहमीच अविवाहित राहीन आणि मला कधीही पुरुष सापडणार नाही.
पुढे फेनेला म्हणाली, 'मला माझ्या केसाळ काख आवडतात आणि त्यांच्यामुळे मला खूप सेक्सी वाटते.'