स्वत:चे खाजगी कपडे विकून 'या' महिलेनं पुरुषांना लावलं वेड, यामागील कारण थक्कं करणारं

नोकरी करुन तितकासा पैसा कमावता येत नाही, जितका आपण एखाद्या बिझनेस करुन पैसे कमाऊ शकतो.

Updated: Mar 15, 2022, 07:05 PM IST
स्वत:चे खाजगी कपडे विकून 'या' महिलेनं पुरुषांना लावलं वेड, यामागील कारण थक्कं करणारं title=

मुंबई : नोकरी करुन तितकासा पैसा कमावता येत नाही, जितका आपण एखाद्या बिझनेस करुन पैसे कमाऊ शकतो. ही गोष्ट जवळ सगळ्याच लोकांना मान्य आहे. त्यामुळे बरेचसे लोक कोणत्या ना कोणत्या बिझनेसकडे वळले आहेत. बिझनेस करणार प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे किंवा ज्यामध्ये फायदा आहे अशा गोष्टी करतात आणि अशीच काहीशी गोष्ट एका मॉडलनं करायला सुरुवात केली. एका ब्रिटीश महिलेने पैसे कमवण्याचा असा एक मार्ग शोधून काढला, की ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. ही महिला तिची टाईट्स म्हणजेच कपड्यांच्या खाली पायात घालण्याचे स्टॉकिंग्स विकून पैसे कमावू लागली.

परंतु यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की, ही महिला वापरलेली स्टॉकिंग्स विकायची. तेही चक्क 4000 हजार रुपयांना. ज्यामुळे काही दिवसातच या महिलेनं 50 लाख रुपये कमावले आहे.

इंग्लंडमधील कॉर्नवॉल येथे राहणारी 27 वर्षीय लिझी ग्रुमब्रिजची उंची 6 फूट 3 इंच आहे. तिचे पाय इतके लांब आहेत की तिला पाहून सगळे थक्क होतात. कोरोना महामारीच्या काळात त्याच्याकडे पैशांची कमतरता होती, त्यानंतर त्याने ऑनलाइन फॅन्स या अॅडल्ट सब्सक्रिप्शन साइटवर विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली.

स्टॉकिंग्स विकून 50 लाखांहून अधिक रुपयांची कमाई केली

वास्तविक, लिझीने तिच्या स्टॉकिंग्स ऑनलाईन फॅन्सवर विकायला सुरुवात केली. ती या स्टॉकिंग्स अज्ञात पुरुषांना विकायची आणि त्यासाठी तिला चांगला मोबदला मिळायचा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लिझीने 18 महिन्यांत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तिने घातलेल्या स्टॉकिंग्सला एवढी मागणी आहे की, लोक मागेल तितकी किंमत द्यायला तयार आहेत.

महिलांच्या स्टॉकिंग्स खरेदीसाठी लोक वेडे झाले

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेच्या स्टॉकिंग्सला इतकी जास्त मागणी आहे की, ती जवळजवळ प्रत्येक आठवड्यात तिच्या पायांसाठी XL आकाराची स्टॉकिंग्स खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये जाते. मग ती 4 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीला त्याला विकते.

लोक त्याच्या या व्यवसायावर टीका करत असले, तरी हे काम करताना आपल्याला आनंद मिळत असल्याचे ती महिला सांगितले.

लोक काय आपलं बिल भरत नाही, त्यामुळे आपल्या आपला मार्ग निवडायला हवा असं म्हणत, ही महिला सांगते की, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.