‘एलियन्सचे मृतदेह’ दाखवणारा एक्सपर्ट दुसऱ्याच दिवशी पलटला, म्हणाला- असे नको करायला होते!

एलियन्सचे मृतदेह जगासमोर सादर करणे म्हणजे स्टंबाजी आहे.  अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने हा खळजनक खुलासा केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 14, 2023, 04:26 PM IST
‘एलियन्सचे मृतदेह’ दाखवणारा एक्सपर्ट दुसऱ्याच दिवशी पलटला, म्हणाला- असे नको करायला होते! title=

Alien dead body :  एलियन्स असल्याचे दावे अनेकदा करण्यात आलेत. मात्र, पहिल्यांदाच जगासमोर एलियन्सचे मृतदेह सादर करण्यात आलेत. मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या  एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यानंतर हे एलियन्सचे मृतदेह सादर करताना येथे उपस्थित असलेले अमेरिकन्स फॉर सेफ एरोस्पेसचे कार्यकारी संचालक आणि यूएस नेव्हीचे माजी पायलट रायन ग्रेव्हज यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. 

मेक्सिकन संसदेत सादर अधिकृत कार्यक्रमादरम्यान या दोन कथित एलियनचे मृतदेह जगासमोर सादर करण्यात आले. मेक्सिकन शास्त्रज्ञांनी हे मृतदेह एलियनचे असल्याचा दावा केला. पेरू देशातील कुस्कोमध्ये सापडलेल्या एलियनचे हे मृतदेह असल्याचा दावा करण्यात आलाय. या व्हिडिओत दोन पेट्यांमध्ये एलियनचे मृतदेह ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.  एलियनचे हे मृतदेह हजारो वर्षे जुने असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच या मृतदेहांना तीनच बोटं असल्याचंही सांगण्यात येतंय. मेक्सिकन शास्त्रज्ञांनी हे मृतदेह एलियनचे असल्याचा दावा केला आहे. 

काय आहे रायन ग्रेव्हज यांचा खळजनक खुलासा?

अमेरिकन संसदेत  UFO अर्थात  Unidentified flying object बद्दल चर्चा करण्यात आली होती. यानंतरच मी मेक्सिकन संसदेच्या चर्चा सत्राचे निवेदन स्वीकारले. मेक्सिकन संसदेत UAP अर्थात Unidentified Anomalous Phenomena चर्चा होणे अपिक्षेत होते. मात्र, येथे काही रहस्यमयी जीवांचे मृतदेह सादर करुन हे मृतदेह एलियनचे असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे अत्यंत निराश झालो आहे. येथे अशा प्रकारे कथित एलियनचे मृतदेह सादर केले जातील याची मला काहीच कल्पना नव्हती असा खळबळजनक खुलासा  रायन ग्रेव्हज यांनी केला आहे. एलियनच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न आहम्ही करत आहोत. तसेच  UFO  आणि UAP  वर देखील संशोधन सुरु आहे. आम्ही एलियन तसेच UFO च्या अस्तित्वाबाबत आमचे अनुभव जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, अशा प्रकारे जगासमोर कथित एलिनयचे मृतदेह सादर करणे म्हणजे ही स्टंटबाजी असल्याचे   रायन ग्रेव्हज यांनी म्हंटले आहे. 

1930 पासून सुरु आहे एलियनवर संशोधन

अमेरिकन संशोधक 1930 पासून एलियनवर संशोधन करत आहेत. 26 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय सुरक्षा उपसमितीची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी Aliens च्या अस्तित्वाबाबत चर्चा करण्यात आली होती.  अमेरिकेत  Aliens तसेच   Aliens बॉडी पार्ट्स आणि UFO अस्तित्वात असल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला होता. यूएस नेव्हीचे रायन ग्रेव्हज, डेव्हिड फ्रेव्हर आणि यूएस मिलिटरीचे कॉम्बॅट ऑफिसर आणि पेंटागॉनचे इंटेलिजेंस ऑफिसर डेव्हिड ग्रुश यावेळी उपस्थित होते.