Alien News : एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे केले जातात. अनेकांनी एलियनशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप एलियनबाबात एकही ठोस पुरावा सापडलेला नाही. अशातच आता एलियनबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3000 वर्षांपासून एलियन भारताचा शोध घेत असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. एलियन अत्यंत गोपनीय पद्धतीने पृथ्वीचे निरीक्षण करत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रियल इंटेलिजेंस (SETI) संबधीत एक संशोधन करण्यात आले. परग्रहवरील जीवसृष्टी आणि एलियनचे अस्तित्व याबाबत या संशोधनात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एलियन बाबबत संशोधन करणारे झेडएन उस्मानोव्ह यांनी अनेक दावे केले आहेत. एलियन हे पृथ्वीपासून 3,000 प्रकाशवर्षे दूर आहेत. ते सातत्याने पृथ्वीवरील मानवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एलियन हे पृथ्वीपासून 3000 प्रकाशवर्ष दूर आहेत. यामुळे एलियन जर पृथ्वीचे निरीक्षण करत असतील तर ते 3000 वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जीवसृष्टी पाहत असतील. याचा अर्थ एलियन जर पृथ्वीचे निरीक्षण करत असतील तर ते रोमन, येमेनी, भारतीय आणि इजिप्शियन सभ्यता पाहत असतील. कोलोझियम, पिरामिड, ताजमहाल आणि इतर प्राचीन चमत्कारांचे बांधकाम तसेच विविध साम्राज्यांचा उदय आणि पतन, धर्मांचा प्रसार, लेखनाचा विकास आणि कला आणि संस्कृतीचा उदय आदी देखील एलियन पाहिले असेल असा दावा झेडएन उस्मानोव्ह यांनी केला आहे. यामुळेच एलियन भारतासह इजिप्त तसेच विविध देशांचा शोध घेत असावेत असा दावा केला जात आहे.
जर एलियन 3000 वर्षांपूर्वी पृथ्वीचे निरीक्षण करत असतील तर ते आधुनिक शहरे, तंत्रज्ञान आणि आव्हानांसह सध्याची पृथ्वी पाहू शकणार नाहीत. त्यांना औद्योगिक क्रांती, महायुद्ध, अवकाश संशोधन किंवा हवामान बदलाविषयी देखील माहिती नसेल. एलियन्सना इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया याबाबत काहीच माहिती नसेल. एलियन्सकडे आधुनिक तंत्रज्ञान नसेल यामुळे एलियनचा मानवाशी संपर्क होणे जवळपास अशक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एलियन पृथ्वीवरील मानवाशी संपर्क साधत असल्याचा दावा सातत्याने करण्यात येत असला तरी खरचं परग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती संशोधकांच्या हाती लागलेली नाही. अनेक उपग्रहांच्या माध्यमातून एलियन्सच्या अस्तित्वाचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप एलियनकडून कोणत्याही प्रकारचा सिग्नन मिळालेला नाही.