आता कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाणी

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण हे मोठ्या काळापासून सुरू असलेल समीकरण आहे. पण यापूढे कांदा कापताना डोळ्यातून पाणी नाही आलं तर नवल वाटून घेऊ नका.

Updated: Jan 11, 2018, 11:02 AM IST
 आता कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाणी  title=

नेवाडा : कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण हे मोठ्या काळापासून सुरू असलेल समीकरण आहे. पण यापूढे कांदा कापताना डोळ्यातून पाणी नाही आलं तर नवल वाटून घेऊ नका.

डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटकावर बरेच वर्षे संशोधन सुरू होते. या संशोधनाला यश मिळाले आहे. हा नवा कांदा आता बाजारातही उपलब्ध झाला आहे. 

नैसर्गिक पद्धत 

 'सुनियॉन' हा डोळ्यात पाणी आणत नाही. हा तयार करण्यासाठी कोणत्या रासायनिक पद्धतींचा वापर न करण्यात आल्याचेही संशोधकांतर्फे सांगण्यात आले आहे. 

अमेरिकेत उपलब्ध 

सुनियॉन अमेरिकेतील नेवाडा आणि वॉशिंग्टन इथे विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. मार्च महिन्यापासून हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. जगभरात आधीपासूनच या कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

का येतं डोळ्यातून पाणी ? 

 कांदा कापल्यानंतर त्यातील एक घटक सल्फ्युरीक अॅसिड तयार करतो. वातावरणामध्ये त्याच वायूत रुपांतर होते. डोळ्याच्या संपर्कात आल्यावर डोळ्यात जळजळ होऊन पाणी येऊ लागते.