तो मुलींच्या मृतदेहांना घरी सजवून ठेवायचा, आणि...

कोण होता तो ? का करायचा असं कृत्य  

Updated: Jan 7, 2022, 12:17 PM IST
तो मुलींच्या मृतदेहांना घरी सजवून ठेवायचा,  आणि... title=

मॉस्को : रशियाच्या एका कुख्यात गुन्हेगाराने लग्न करण्यासाठी मेंटल इंस्‍टीट्यूटकडून सुटकेची मागणी केली. त्याने लग्नासाठी सुटकेची मागणी केली. पण तो वेगळंच कृत्य करायचा. यासाठी या व्यक्तीला अटक देखील करण्यात आली. हा माणूस स्मशानभूमीतून मुलींचे मृतदेह चोरून घरी घेऊन जायचा. मग तो त्यांना घरात बाहुल्यांच्या रूपात सजवत असे. त्याने 26 मुलींचे मृतदेह घरात ठेवले होते.  

Anatoly Moskvin असे या माणसाचं नाव आहे आणि एकेकाळी तो इतिहासकार होता. Anatoly Moskvinने विनंती केली की, त्याला रशियामधील  मेंटल इंस्‍टीट्यूटतून सोडण्यात यावे जेणेकरून तो लग्न करू शकेल. डेली स्टारच्या वृत्तानुसार, 55 वर्षीय मॉस्कविन रशियातील निझनी नोव्हगोरोड शहरातील रहिवासी आहेत.

Moskvinला नोव्हेंबर 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर 3 ते 12 वयोगटातील 26 मुलींचे मृतदेह कबरीतून बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्याच्या या कृत्याचा व्हिडीओ पोलिसांनी समोर आणाला आहे. 

त्याने चोरलेले मुलींचे मृतदेह सोफ्यावर ठेवण्याचं दृष्य व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.  Moskvinला आता मानसिक उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केलं आहे. 

अटकेनंतर दिलेल्या मुलाखतीतही त्याने मुलांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी, त्यांनी असेही सांगितले की त्यांचा विश्वास आहे की तो विज्ञान किंवा काळ्या जादूद्वारे 26 मुलीं जीवन परत आणू शकतो.