मुंबई : बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ते आहेत. असे म्हणतात की दृष्टी नसतानाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येतं. त्यांची आतापर्यत अनेक भाकीते खरी ठरल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भविष्यवाण्या या मनुष्य आणि धरतीचा र्हास करणाऱ्या असल्याने मानव जातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यत त्यांनी सांगितलेल्य़ा 2 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत, तर इतर 4 अजून खऱ्या ठरायच्या बाकी आहेत.त्यामुळे या 4 भविष्यवाण्या काय आहेत त्या जाणून घेऊयात.
बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षाची भविष्यवाणी केली आहे. त्यांनी या वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली. यापैकी दोन आत्तापर्यंत खरे ठरले आहेत. अशा स्थितीत नागरीकांना भीती वाटते की उरलेले चार खरे ठरले तर काय होईल?
'ही' भाकित ठरली खरी
बाबा वेंगा म्हणाले होते की 2022 मध्ये अनेक आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये भीषण पूर येईल. सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियात मुसळधार पावसामुळे पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बाबा वेंगा यांनीही अनेक शहरांमध्ये दुष्काळाची शक्यता वर्तवली होती. सध्या युरोपातील अनेक भागात भीषण दुष्काळ आहे. इटली 1950 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळातून जात आहे. या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.
इतर चार भविष्यवाण्या
सायबेरियात विषाणूचा शोध लागेल
सायबेरियामध्ये संशोधकांना एक प्राणघातक विषाणू सापडेल जो आतापर्यंत गोठलेला होता. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरेल, असं बाबा यांनी भविष्यवाणीत सांगितलंय.
एलियन्सचा पृथ्वीवर हल्ला
बाबा वंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत असे सांगितले आहे की, 2022 मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियनद्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल, त्यानंतर हे एलियन पृथ्वीवरील लोकांवर हल्ला करू शकतात.
गॅजेट्सचा होईल मोठ्याप्रमाणात वापर
बाबा वंगा यांनी भविष्यवाणीत सांगितले की, लोकांचा गॅजेट्स समोरील स्क्रिन टाईम वाढेल. यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल.
भारतात टोळांचा हल्ला
2022 मध्ये भारतात तापमान वाढ होईल. देशात कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल, असं बाबा वंगा यांनी भविष्यवाणीत सांगितलं. तापमान वाढीमुळे टोळांचे प्रमाण वाढेल हे टोळ शेतातील पिकांवर हल्ला करतील.यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असंही बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे.
दरम्यान आता इतर चार भाकिते खरी ठरणार का याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे.