मुंबई : सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेतात किंवा पार्लरमध्येही जातात. एका महिलेनं खास ब्युटी प्रोडक्ट पार्लरमध्ये वापरल्यानंतर तिचा अनुभव शेअर केला. या महिलेचा चेहरा पूर्ण बिघडला. तिच्या चेहऱ्याची अवस्था पाहून धक्काच बसेल.
अनेक महिलांनी आता प्लास्टिक सर्जरी करायला सुरुवात केली आहे. जरी असे उपाय त्यांच्यासाठी खूप प्रभावी आहेत. धक्कादायक प्रकार इंग्लंडमधील एका महिलेसोबत घडला. अलीकडेच या महिलेने चेहरा सुंदर करण्यासाठी आयब्रो ट्रिटमेंट केली, मात्र त्यानंतरच तिला अॅलर्जी झाली आणि चेहऱ्यावर सूज आली.
आता ही महिला इतर मुलींना अशी चूक करू नये यासाठी जागरूक करत आहे. एका अहवालानुसार, या महिलेचं नाव मिशेल क्लार्क आहे. 31 वर्षीय मिशेल युनायटेड किंग्डममध्ये राहते. तिने आयब्रो नीट करण्यासाठी ट्रिटमेंट घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती एका पार्लरमध्ये गेली.
तिने पार्लरमध्ये आयब्रो वॅक्सिंग आणि कलर करून घेतले. त्यानंतर ती घरी परतली. घरी आल्यावर तिला ऍलर्जी होऊ लागली. पण असं होऊ शकतं म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिचा चेहरा खूप सुजला होता. तिचा चेहरा बघून ती स्वतःच घाबरली.
आता ती जिवंत राहू शकेल की नाही अशी शंका तिलाही येऊ लागली. तिने तातडीनं दवाखान गाठला. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. तिची त्वचा पूर्णपणे जळल्यासारखी झाली होती. या सगळ्यातून बरं होण्यासाठी 8 ते 10 आठवडे लागल्याचंही तिने सांगितलं. 3 ते 4 आठवडे आयब्रोवर सूती कपड लावायला सांगितलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मिशेलला ऍलर्जी आयब्रोवर केलेल्या कलरमुळे झाली होती. मिशेल म्हणते की ही घटना तिच्यासोबत 2020 मध्ये घडली होती. आता ती इतर मुलींना याबद्दल जागरूक करत आहे.
मिशेलच्या म्हणण्यानुसार आयब्रो कलर करणं टाळलं पाहिजे, पण जर तुम्ही ते करत असाल तर व्यावसायिक आयब्रो प्रॅक्टिशनरकडूनच करून घ्या. पण शक्यतो अशा गोष्ट न करणं केव्हाही बरं कारण त्यामुळे अॅलर्जी येऊ शकते आणि नुकसानही होऊ शकतं.