सियालकोट : पाकिस्तानातील सियालकोटमध्ये अनेक मोठे स्फोट झाले आहेत. स्फोटांमुळे लष्काराच्या तळावर आग लागली आहे. झालेल्या स्फोटामुळे पाकिस्तान हदरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील लष्कराच्या तळाला लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, स्फोट नक्की कसे झालं हे अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये सत्तापालट होत असतानाच सियालकोटमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं पद जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
अशात सियालकोटमध्ये झालेले अनेक मोठे स्फोट इम्रान सरकारला अडचणीत आणू शकतात. विरोधकांकडून इम्रान सरकारवर बहुमत सिद्ध करण्यासाठी दबाव आणला जात आहे.
देशातील आर्थिक संकट आणि महागाईबद्दल इम्रान सरकारला जबाबदार धरत विरोधकांनी 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयात अविश्वास प्रस्ताव मांडला.
तर दुसरीकडे, इम्रान सरकारच्या 24 खासदारांनी पक्षाविरोधात बंड करून विरोधी पक्षात प्रवेश केला आहे. 21 मार्च रोजी अविश्वास ठरावाबाबत एक सत्र बोलावण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे.