Girlfriend Boyfriend Viral Video : खरं प्रेम काय असतो हो...असा प्रश्न अनेकांना पडतो. मरेपर्यंत त्याची साथ कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही, म्हणजे खरं प्रेम ना...पण हे प्रेम कुठे तरी हरवत चालं आहे. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास...मग हा विश्वास कुठे जातोय? एक व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करतो पण दुसरी व्यक्ती आपल्या या प्रेमाला दुसऱ्यासोबत वाटत असेल तर...
आजकाल विश्वास नक्की कोणावर ठेवाव असं झालं आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो किंवा नवरा बायको यांची विश्वासाला तडा जायला लागला आहे. तुम्हाला हे जरा असंवेदनशील वाटेल पण हल्ली फसवणूक ही एक प्रवृत्ती बनत चालली आहे. शारीरिक सुखासाठी आणि आर्थिक लाभासाठी एका नात्यातून सहज जोडप्यातील एक जण दुसरीकडे जात आहे. (Boyfriend goes to surprise girlfriend but her kissing another man video viral Trending video today google )
गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीच्या वाढत्या ट्रेंडमध्ये अजून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. इंस्टाग्रामवरील या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी प्लन केला आहे. तुम्ही पाहू शकता घर पताका आणि रंगेबीरंगी फुग्यांनी सजवलं आहे. तो तरुण एका बॉक्समध्ये बसला आहे. त्याच्या सोबतचे मित्रमैत्रीणी गर्लफ्रेंडला सरप्राईज मिळाल्यानंतरची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत.
हो, तो गर्लफ्रेंडला सप्रराईज द्यायला गेला आणि तोच सप्रराईज झाला. कारण ती तरुणी दुसऱ्या तरुणासोबत त्याचा मिठीत किस करत घरात प्रवेश करते. हे दृश्य पाहून सगळेच अवाक् होतात. बॉयफ्रेंडला धक्का बसतो. सप्रराईज देण्यास आलेल्या एका तरुणापैकी एक जण फुगा फोडतो आणि त्या तरुणीला भान येतं.
प्रेमाचा असा अपमान त्या तरुणाला असह्य झाला होता. तरुणी बॉयफ्रेंडला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो खूप दुखावला गेला असतो. तो त्या दोघांना घरातून जाण्यास सांगतो.
हा हृदयद्रावक व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील dreamachieevers या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सला आपले अश्रू अनावर झाले आहेत. अनेक यूजर्सचं असं म्हणं आहे की, ''आजच्या जगात खरं प्रेम शोधणं कठीण झालं आहे.'' ''मुलगा असो किंवा मुलगी कोणाच्याही भावनांशी असा खेळ अमान्य आहे.''
दुसरा यूजर्स म्हणतो, ''यार या घटनेतून अनेक पुरुष गेले आहेत. मला माहिती आहे हे खूप वेदनादायक आणि दुःखदायक आहे.''